Pune Nashik News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत, रस्ता अडवून एसटी चालकाला मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

Pune Nashik Higway Manchar News : पुणे नाशिक महामार्गावर थार गाडीतील तरुणांनी एसटी चालक व कंडक्टरवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागरिकांनी तात्काळ पोलिस कारवाईची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • महामार्गावर रस्ता अडवून चालक-कंडक्टरवर हल्ला

  • प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी वाढली

  • पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पुणे नाशिक महामार्गावर गुंडगिरीचा थरार पाहायला मिळाला आहे. घाटात गाडी आडवी लावून बसमध्ये घुसत ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी लवकरात लवकर या गाव गुंडांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर खेड ते मंचर दरम्यान एसटी बस धावत होती. यादरम्यान काही तरुणांच्या थार गाडीने या बसचा रस्ता अडवला. गाडी बसच्या समोर आडवी लावून गाडीतील तरुण एसटीमध्ये घुसले. यानंतर चालकाने बस चालू केली असतात या तरुणांनी चालकालाच चालू बसमध्ये मारहाण केली.

या मारहाणीदरम्यान प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मारहाण सुरु असताना प्रवाशांपैकी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने मारहाण थांबवण्यास सांगितली. मात्र त्यांच्या विंनतीला न घाबरता या गुंडांनी चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असं म्हटलं जात आहे.

या तरुणांनी फक्त बस चालकाला मारहाण न करता कंडक्टरवर देखील हल्ला केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पण ही गुंडगिरी प्रवाशांमध्ये दहशत पसरवत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली असून, पोलिस कारवाईची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express : हा कसला माज ! मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, VIDEO

Maharashtra Live News Update: प्रिया बापट यांच्या हस्ते तनिष्क च्या "डोर" या नवीन दागिन्यांच्या कलेक्शन चे लाँच

Diabetes Care: आई-वडिलांना मधुमेह आहे? 'या' २ बदलांमुळे जाणवेल मोठा फरक, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

माजी CM च्या मैत्रिणीची पक्षातून हकालपट्टी, महिला नेत्याने स्थापन केला नवा पक्ष, राजकारणात खळबळ

LPG भारतात कसा आला? पहिले एलपीजी कनेक्शन कधी बसवण्यात आले?

SCROLL FOR NEXT