Pune News :  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : शेवटचा हिशोब कागदावर लिहिल्यानंतर बिल्डरने संपवलं जीवन, पुण्यात खळबळ

Pune builder ends life : पुण्यात तरुण बिल्डरने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरात तरुण बिल्डरने जीवन संपवलं आहे. या घटनेने पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात तरुण बिल्डरने आत्महत्या केली आहे. या बिल्डर तरुणाने स्वत:च्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नऱ्हेमध्ये बिल्डर तरुणाने त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. मयूर सुनील नरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मयूर हा जांभुळवाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुर विवाहित होता. जांभुळवाडी परिसरात राहणाऱ्या मयूरचे नऱ्हे भागातील एका इमारतीत त्याचे कार्यालय होते. मयूर फ्लॅट खरेदी-विक्री करत होता. त्याचबरोबर प्लॉट देखील खरेदी करून विक्री करत होता.

मयूर रविवारी रात्री घरीच आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ मयूरच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी त्यानं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आलं. मयूरने आत्महत्या का केली, याचं कारण समजू शकलेलं नाही.

मयूरने आत्महत्येपूर्वी काही हिशोब कागदावर लिहून ठेवली. त्याचबरोबर कोणाकडून किती पैसे येणे आहे, ती कोणाला किती देणे आहे, असा एक पेपर पोलिसांना मिळाला आहे. मयूरच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच जांभुळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT