Pune News
Pune News SAAM TV
मुंबई/पुणे

Pune News : रील्स करणाऱ्या तरुणांची दुचाकी स्कुटीला धडकली; ३१ वर्षीय महिलेला गमवावा लागला जीव

Dnyaneshwar Choutmal

Pune Accident News : पुण्यात धक्कादायक आणि हृदय हेलावणारी दुर्दैवी घटना घडली आहे. भररस्त्यात रील्स करणाऱ्या तरुणांच्या दुचाकीची बाजूने चाललेल्या दुचाकीला धडक लागली. या अपघातात स्कुटीवरील ३१ वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला. या प्रकरणी रील्स करणाऱ्या दोन तरूणांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुण्यातील महमदवाडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रील करण्याच्या नादात तरुणांच्या दुचाकीची धडक बाजूने जाणाऱ्या स्कुटीला लागली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.

तस्लिमा पठाण असे ३१ वर्षीय महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आयान शेख आणि झायद शेख या दोघा तरूणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झायद हे दोघेही सोशल मीडियावर रील्स करण्यासाठी दुचाकीवर स्टंट करत होते. त्याचवेळी तस्लिमा पठाण या स्कुटीवरून घरी जात होत्या. आयान शेख हा दुचाकी चालवत रिल्स बनवण्यासाठी स्टंट करत होता. तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हिडिओ काढत होता.

आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत पठाण या खाली पडल्या. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दोघांनी तिथून पळ काढला.

सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी हे दोघेही तिथे आले असता, ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली, असे तपासात समोर आले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाही, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केला; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT