Fake Baba Arrested in Koregaon Park After Tricking Woman With 'Golden Pot' Black Magic Promise Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune: सांगितलं सोनं निघाली माती; कोरेगाव पार्कमधील महिलेला हंडा देऊन गंडा, भोंदू बाबाने अडीच लाख उकळले

gold pot black magic deception case in Pune : पुण्यात कोरेगाव पार्कमधील महिलेला सोन्याचा हंडा मिळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांना फसवण्यात आले. भोंदूबाबाने दिलेल्या हंड्यात माती निघाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Akshay Badve

superstition-based fraud in Koregaon Park exposed : सुजाण पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये गुप्तधन शोधून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तब्बल अडीच लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गंडा घालून "खान बाबा" फरार झाला होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. यावरून खान बाबा उर्फ मदारी महमद खान या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार १२ जून ते १५ जुलै दरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्क मधील गल्ली क्रमांक ७ या ठिकाणी घडला. ४२ वर्षीय फिर्यादी या पुण्यातील कोथरूडच्या रहिवाशी आहेत. फिर्यादी आणि खान बाबा यांची एका व्यक्तीमुळे ओळख झाली होती. या भोंदू बाबा ने फिर्यादी यांना तुमच्या घरात गुप्तधन आणि सोन्याचा खजिना आहे आणि ते मी काढून देतो असं अमिष दाखवलं. या अमिषाला बळी पडून फिर्यादी तयार झाल्या.

या भोंदू बाबा ने फिर्यादी यांना गुप्तधन आणि सोन्याचा हंडा शोधण्यासाठी काही विधी आणि हवन करावा लागेल असं सुद्धा सांगितले आणि त्यासाठी काही पैसे लागतील अशी बतावणी केली. विश्वास संपादन झाल्यामुळे फिर्यादी यांनी भोंदू बाबाला वेळोवेळी तो मागत असलेली रक्कम द्यायला सुरुवात केली. फिर्यादी यांनी आरोपीला वेळोवेळी रक्कम देऊन तब्बल 2 लाख 60 हजार रुपये गमावले.

पंधरा दिवसांपूर्वी महिलेच्या घरी पूजा मांडून तिला एक मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले. हे कापड 17 दिवसांनी उघड तुला सोनं मिळाले, असे सांगितले. मात्र या हांड्यात माती होती.

आपल्या घरात कुठलंच गुप्तधन नाही आणि आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), महाराष्ट्र नरबळी व इ अमानुष अनिष्ट अघोरी प्रता व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत असलेल्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर अन् अशोक सराफ पुन्हा एकत्र, सेटवरचा फोटो समोर

SCROLL FOR NEXT