pune news Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; शिंदे हायस्कूलजवळ एकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या

pune firing News : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार घडला आहे. शिंदे हायस्कूलजवळ एकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आहेत.

Vishal Gangurde

पुण्यात पुन्हा गोळीबार

नामांकित शाळेवर एकावर गोळीबार

गोळीबारात एक जण जखमी

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ताजी असताना पुणे शहरातही गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील शिंदे हायस्कुलजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील शिंदे हायस्कूलजवळीवर मेडिकलवर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर रस्त्यावर उभे असलेल्या लोकांची एकच धावाधाव झाली.

शाळेजवळ झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मेडिकलवर गोळीबार झाल्याची माहीती हाती आली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबाराने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी शिरूरमध्येही गोळीबाराची घटना घडली होती. शिरूरच्या करडे घाटात कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विशाल काळे असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव होते. शिरूरनंतर आता पुण्यात गोळीबार झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; लग्नाच्या २ वर्षांनी घरी हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला VIDEO

Maharashtra News Live Update: पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात ब्लास्ट

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक बंद, पाहा VIDEO

Weight loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा ओट्सचा 'हा' चटपटीत पदार्थ, वजन होईल कमी अन् दिसाल स्लिम- ट्रिम

PPF Interest Rate 2026: गुड न्यूज! PPF पासून ते सुकन्या समृद्धीपर्यंत..., सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT