Pune Water Supply Updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद, कारण?

Pune Water Supply Latest News Update : येत्या गुरुवारी पुणे शहरात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं वृत्त आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Pune water Supply News:

पुण्यातील पाणीपुरवठ्यासंदर्भात मोठं वृत्त हाती आलं आहे. पुणे शहरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत विविध जलकेंद्र व टाक्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं वृत्त आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.

यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमध्ये गुरुवारी पाणी येणार नाही. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतुशृंगी टाकी नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र त्यावर अवलंबून परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी काही सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी यांनी दिली आहे.

राज्यासहित पुण्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे १०० टक्के भरू शकली नाही. या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरा अन्यथा जानेवारीपासून पाणीकपात करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दिला होता. यानंतर आता पालिकेने देखभाल दुरुस्तीच्या आडून अघोषित पाणीकपात लादल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर देत चाहत्यांना दिली बातमी

SCROLL FOR NEXT