Pune Water Supply Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Water Supply Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Cut On Friday: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. १६ ऑगस्ट रोजी पुण्यातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा गैरवापर करु नये, पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन केले जात आहे.

पुणे शहरातील ससून रुग्णालय परिसरातील पाण्याची मुख्य वाहिनी फुटली आहे. पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली आहे. त्यामुळे खूप जास्त पाणी वाया गेले आहे. याच जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यामुळेच शुक्रवारी पुणे शहरातील निम्म्याहून अधिक भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी साठवून ठेवावे.

या ठिकाणी राहणार पाणीपुरवठा बंद

पुणे स्टेशन, मंगळवार पेठ, स्वारगेट, ससून रुग्णालय परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, संचेत हॉस्पिल परिसर, सांगमवडी परिसर या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शनिवारी खूप कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी आधीच खबरदारी घ्यायला हवी.

पुणे शहरातील धरणांमधील पाणीसाठा

पुणे शहरात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुण्यातील चारही धरणांमध्ये ९३.११ टक्के पाणीसाठा आहे.त्यामुळे पुणेकरांच्या पाण्यांची चिंता मिटली आहे. टेमघर धरण १०० टक्के भरले आहे. तर खडकवासला धरणात ८२.१३ टक्के पाणीसाठा आहे. पानशेत धरणात ९३.३७ टक्के तर वरसगाव धरणात ९२.५९ टक्के पाणीसाठा जमा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT