pune accident  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात भरधाव कार पुलावरून कार नाल्यात कोसळली; निर्भीड लष्करी अधिकाऱ्याने चालकाचा जीव वाचवला

pune accident : पुण्यात भरधाव कार पुलावरून कार नाल्यात कोसळल्याची घटना घडली. अपघातानंतर लष्करी अधिकाऱ्याने चालकाचा जीव वाचवला.

Vishal Gangurde

पुण्यातील वानवडीतील पुलावर भीषण अपघात

कार थेट नाल्यात कोसळली

जीव वाचवणाऱ्या लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांचे सर्वत्र कौतुक

पुण्याच्या वानवडी परिसरात गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळी भैरोबा नाल्यावरील पुलावर भीषण अपघाताची घटना घडली. चारचाकी गाडी नियंत्रित होऊन कार थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. अपघातावेळी आशिष कुमार यादव यांनी तात्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला.

पुलावरून जाताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आशिष कुमार यादव यांना रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. चौकशी केल्यानंतर नाल्यात कोणीतरी अडकल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी क्षणाचा विलंब न करता नाल्यात उतरले. त्यावेळी त्यांना कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत दिसली.

त्यांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीची काच फोडली. त्यांनी जखमी चालकाला बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या नाकातून रक्तस्राव होत होता. लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत यादव यांनी तातडीने चालकाच्या नाकावर दाब देऊन रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला नाल्यातून बाहेर काढले. त्याच्याजवळ एक ते दीड लाख रुपये होते.

चालक शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याजवळील रोख रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे परत दिली. त्यानंतर टेम्पोच्या मदतीने जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, असे पीएसआय बाळासाहेब वाकडे यांनी सांगितलं आहे. चालकावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी आता नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे. तसेच या अपघाताचे कारण शोधण्याचाही तपास सुरु आहे. अपघातानंतर संरक्षक कठड्यांची अवस्था याबाबतही चौकशी करण्यात येत आहे. चालकाचा जीव वाचवणाऱ्या आशिष कुमार यादव यांचं कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT