Pune Video saam tv youtube
मुंबई/पुणे

Pune Video : झाडातून निघाला पाण्याचा झरा? झाड रडू लागल्याने झाडाची पूजा? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Pune Viral Video : एक व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामध्ये झाडातून पाणी येत असल्याचं दिसतंय...पाणी येत असल्याने लोकांनी झाडाची पुजा केली आणि हा चमत्कार असल्याचा दावा केला...पण, खरंच हा दैवी चमत्कार आहे का..? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Yash Shirke

झाडातून चक्क पाणी वाहतंय...त्यामुळे लोकांनी हा चमत्कार झाल्याचं म्हणत झाडाची पूजा केलीय...झाडाला हार, हळद-कुंकू लावून झाडाचं पाणी प्राशन केलंय...हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत असून, दैवी चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आलाय...

झाडातून पाणी बाहेर आल्याने अनेकांनी गर्दी केली...काहीजणांनी तर झाड रडत असल्याची अफवा पसरवली...ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरल्याने अनेकांनी हे झाड पाहण्यासाठी गर्दी केली...हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्यावेळी हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवडमधील असल्याचं समोर आलं...

पण, पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं...आणि तिथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय हे गंभीर आहे...आम्ही याबाबत आणखी माहिती मिळवली... याबाबत झाडाची तपासणी करणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली...

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

- सोसायटीची पाईपलाईन झाडाजवळ फुटली होती

- पाईपलाईन फुटल्याने पाणी झाडातून वाहत होतं

- दैवी चमत्कार नसून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका

अधिकाऱ्यांनी या झाडाची पाहणी केल्यानंतर अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या पुणेकरांचा मात्र भ्रमनिरास झाला...त्यामुळे अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका...आमच्या पडताळणीत हा दैवी चमत्कार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT