सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Vidyanand Bapat assaulted on Tilak Road Pune : गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना ऑन कॅमेरा मारहाण झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या टिळक रोडवर हा प्रकार घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोड परिसरात गणेशोत्सवातील डीजे आणि आवाजाच्या त्रासाबाबत प्रत्यक्ष नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. यावेळी स्थानिक एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. वाद वाढल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विद्यानंद बापट यांना भरचौकात बेदम मारहाण केली.
विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे. ही अतिशय गंभीर बाब आहे. जनतेसाठी आवाज उठवणाऱ्यांना मारहाण करण्याची ही परंपरा तशी जुनीच आहे; परंतु डीजे बंदीच्या प्रकरणात सर्व जनता त्रस्त असताना, त्याबाबत भूमिका मांडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मारहाण आणि धमक्या मिळणे, हा पोलीस व सरकारच्या नाकर्तेपणाचा कळस आहे. आम्ही केवळ याचा निषेध करून थांबणार नाही, तर ही मोहीम आणखी तीव्र करूसुनील माने,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
डीजेच्या दणधणाटाविरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच विद्यानंद बापट हे गणेश मंडळांच्या निशाण्यावर होते, असं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला आहे.
तो चुकीचं बोलतो, त्याला मारायलाच पाहिजे होतं
पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्याधर बापट यांना भरचौकात झालेल्या मारहाण प्रकरणात आता एका कार्यकर्त्याची धक्कादायक भूमिका समोर आली आहे. "तो गणेशोत्सवाबद्दल चुकीचं बोलत होता, त्यामुळे त्याला मारायलाच पाहिजे होतं," असं समर्थन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यानं केलं आहे. 'साम टीव्ही' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली.
संबंधित कार्यकर्त्याने बोलताना पुढे म्हटलं की, "पुण्यात फक्त गणेशोत्सव आहे का? जो कोणी गणेशोत्सवाच्या विरोधात बोलेल, त्याला असंच कानशिलात मारणार आणि धडा शिकवणार!"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.