Vaishnavi Hagawane Suicide Case Saam TV News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case : पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, वैष्णवीचे वडील म्हणाले नाईलाजानं मला मुलीचं लग्न करावं लागलं, आणि...

Vaishnavi Hagawane Suicide Case : हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचं लग्न दोनवेळा तुडले आणि नाईलाजानं मला मुलीचं लग्न करावं लागलं. आता तपासात अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये.

Prashant Patil

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात सातत्याने धक्कादायक खुलासे होताना दिसताय. वैष्णवीवर हगवणे कुटुंबियांकडून अत्याचार करण्यात आला. आता वैष्णवीच्या कुटुंबियांनी थेट आरोप केले आहेत. वैष्णवीच्या चरित्र्यावर संशय घेणे योग्य नसल्याचं देखील तिच्या वडिलांनी म्हटलं. हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचं लग्न दोनवेळा मोडलं आणि नाईलाजानं मला मुलीचं लग्न करावं लागलं. आता तपासात अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये. शशांक हगवणे हा वैष्णवीला ५ दिवस आणि नंतर ३ दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करत होता.

निलेश चव्हाण, लता चव्हाण आणि करिश्मा चव्हाण यांचा मोबाईल देखील पोलिसांनी लंपास केलाय. हगवणे कुटुंबाचं बँक खाती गोठवण्यात आली आहेत. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचं तपासात उघड झालंय. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे याची एकत्रित चौकशी पोलिसांना करायची आहे. निलेश चव्हाण यांच्यावर कस्पटे कुटुंबाने आरोप केली आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलीये.

पोलीस तपास करत असून वेगवेगळे अपडेट पुढे येताना दिसत आहेत. लग्न झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनंतरच वैष्णवीचा छळ करण्यात हगवणे कुटुंबियांनी सुरूवात केली. एक एक मागणी त्यांच्याकडून केली जात होती. जमीन घेण्यासाठी दोन कोटी माहेरहून आण, म्हणून तिचा छळ होत होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या अंगावर जखमा असल्याचं नमूद करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूच्या काही तास अगोदरही वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांपासून तिच्यावर अत्याचार सुरू होते.

फक्त मारहाणच नाही तर ननंद करिश्मा आणि तिचा मित्र निलेश चव्हाण यांच्याकडून तिला मानसिक त्रास दिला जात होता. सततच्या होणाऱ्या त्रासाबद्दल वैष्णवी हिने आपल्या मैत्रिणीला देखील सांगितलं होतं. ज्याचा विचार कधी केला नाही ते आपल्यासोबत होत आहे, असं वैष्णवीने म्हटलं होतं. वैष्णवी ही घटस्फोट घेण्याचा देखील विचार करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT