Vaishnavi Hagawane Death Case Saam Tv News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : वैष्णवीने २ वर्षांपूर्वीही घेतला होता टोकाचा निर्णय, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवे वळण, दीड वर्षांपूर्वी कीटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न. आता पोलिसांनी रुग्णालय व एम्सकडून अहवाल मागवले. आरोपींवर कठोर कारवाई सुरू.

Namdeo Kumbhar

Pune Vaishnavi Hagawane Death Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) माजी नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे (वय २४) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ माजवली. वैष्णवी यांचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हगवणे कुटुंबाकडून वैष्णवी यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे वैष्णवी हिने दोन वर्षांपूर्वीही टोकाचा निर्णय घेतला होता. वैष्णवीने किटकनाशक खाऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला वाचवण्यात आले होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यावेळच्या संबंधित रूग्णालयाकडून रिपोर्ट मागवले आहेत.

दोन वर्षांपूर्वी वैष्णवी यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. वैष्णवी हगवणे यांनी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी कीटकनाशक प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिंपरची चिंचवड पोलिसांनी खासगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्रे मिळवली असून पुढील तपास सुरू आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे पोलिसांकडून या प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र हगवणेसह इतर आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुणावली आहे. वैष्णवी यांची आत्महत्या की हत्या? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वैष्णवीच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमांमुळे हे प्रकरण हत्येचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवी यांचा मृतदेह १६ मे रोजी सासरच्या घरी गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्या वडिलांनी अनिल कस्पटे यांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला. कस्पटे यांच्या तक्रारीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, एक लक्झरी कार आणि चांदीचे भांडी देण्यात आली होती. तरीही, हगवणे कुटुंबाने २ कोटी रुपयांच्या जमिनीच्या खरेदीसाठी अतिरिक्त खंडणीची मागणी केल्याचा दावा केलाय. या प्रकरणात वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना पोलिसांनी अटक केली. तर राजेंद्र हगवणे आणि सुषील हे फरार होते. शुक्रवारी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महापौर पदग्रहण कार्यक्रमात उफाळून आली भाजपमधील गटबाजी

पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

Black Saree Contrast Blouse: काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Sambhajinagar News : 'आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू' छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची नावे द्या आणि बक्षिसं जिंका, पोलिसांची अनोखी योजना

SCROLL FOR NEXT