Pune : चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळून दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Pune : चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळून दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी!

चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळला गेल्याने, एक 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात चिनी मांजाने एका डॉक्टर महिलेचा जीव घेतला होता. तश्याच पद्धतीच्या घटनेची पुनरावृत्ती बोपोडी परिसरात झाली आहे. चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळला गेल्याने, एक 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून हा तरुण सुखरूप बचावला आहे.

हे देखील पहा :

चिन्मय सुर्यकांत वाखारे असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्याहून आपल्या घराकडे जात असताना बोपडी जवळील जुन्या जकात नाका या परिसरात अचानकपणे पतंगाचा एक दोरा चिन्मयच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. हा दोरा काढण्यासाठी चिन्मयने प्रयत्न देखील केले. मात्र, काही कळण्याआधीच त्याचा गळा आणि हाताची बोटे कापली गेली. तेव्हा चिन्मयच्या लक्षात आले की तो साधा सुधा दोर नसून चिनी मांजा आहे.

गळा आणि बोटे कापलेल्या अवस्थेतच चिन्मय डॉक्टरकडे गेला आणि कापलेल्या गळ्यावर आणि बोटावर उपचार घेतले. केवळ दैव बलवत्तर म्हणून आणि मांजा ने झालेली जखम जास्त खोल नसल्याने चिन्मय बचावला असे डॉक्टरांनी म्हटलं आहे. सध्या चिन्मय ची प्रकृती स्थिर आहे. मात्र चिनी मांज्याच्या वापरावर बंदी असून देखील त्याची सर्रास विक्री केली जात आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन मांजा विकणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अन्यथा अनेकांचे नाहक बळी जातील असा संताप चिन्मयच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT