Pune Traffic Changes  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरातील वाहतूक मार्गात १७ फेब्रवारीपर्यंत मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Changes: पुण्यात पोलिस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे. पोलिस भरतीमुळे पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील काही रस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

Priya More

Summary -

  • पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल

  • पोलिस भरतीमुळे पाषाण रोडवरील वाहतूक मार्गात मोठे बदल

  • १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते बंद राहणार

  • पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. पाषाण रस्त्यावरील वाहतुकीत पोलीस भरतीमुळे हे बदल करण्यात आले आहेत. पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलिस मुख्य परिसरात वाहतुकित बदल करण्यात आले असून दररोज पहाटे ४ ते सायंकाळी ६ या वेळेत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता १७ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी सहकार्य करत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुण्यामध्ये पोलिस भरती प्रक्रिया पार पडत आहे. या पोलिस भरतीमुळे पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत पहाटे ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या आवारात दररोज पोलीस भरतीसाठी दररोज मोठ्या संख्येने उमेदवार येत आहेत. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस भरतीसाठी पुण्यात दररोज मोठ्या संख्येने उमेदवार येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत पाषाण रस्त्यावरील पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्यावरील पुरंदर हॉल दरम्यानचा रस्ता बंद राहणार आहे.

तसंच, पाषाण रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्यावरील प्रवेशद्वार हा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. रस्ते बंद असल्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT