Shruti Vilas Kadam
वडिलांसोबतच्या खास आठवणींचा फोटो आणि मनापासून लिहिलेला संदेश असलेली फ्रेम त्यांच्यासाठी उत्तम भेट ठरू शकते.
आरोग्याची काळजी घेणाऱ्या वडिलांसाठी स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड उत्तम पर्याय आहे. यामुळे त्यांच्या दैनंदिन हालचाली आणि आरोग्याची माहिती मिळू शकते.
वाचनाची आवड असलेल्या वडिलांना त्यांच्या आवडत्या विषयावरील पुस्तक किंवा ई-बुक रीडर भेट देऊन आनंद देता येईल.
त्यांच्या नावासह किंवा खास संदेशासह तयार केलेला कॉफी मग ही रोज वापरता येणारी आणि आठवणीत राहणारी भेट ठरू शकते.
स्टायलिश आणि टिकाऊ वॉलेट, बेल्ट किंवा इतर अॅक्सेसरीज वडिलांसाठी उपयुक्त आणि आकर्षक गिफ्ट ठरतात.
वडिलांच्या आरोग्याची आणि आरामाची काळजी घेण्यासाठी हेल्थ चेकअप पॅकेज किंवा रिलॅक्सेशन स्पा व्हाउचर भेट देऊ शकता.
कधी कधी महागडी भेटवस्तू नव्हे, तर कुटुंबासोबत घालवलेला दर्जेदार वेळ सर्वात मौल्यवान ठरतो. त्यांच्यासोबत सहल, जेवण किंवा छोटासा कार्यक्रम आयोजित करा.