Pune Traffic News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी थेट आयुक्त रस्त्यावर उतरले, भल्यापहाटे घेतला आढावा

Pune Traffic Police News : पुण्यातील वाहतूक कोंडी वाढत असल्याने नवे नियम लागू करण्यात आले आहेत. याचदरम्यान पोलिसांशी वाद घालणाऱ्या चारचाकी चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने पोलिसांची माफी मागितली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात वाहतूक कोंडी वाढत असून प्रशासनाकडून नवे नियम लागू

  • वाहनचालकाने पोलिसांशी वाद घातला, पोलिसांनी दाखवला दम

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • विमाननगरमध्ये एकेरी वाहतूक लागू

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही जैसे थेच आहे. शहराचा विस्तार चार ही बाजूने होत असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवताना दिसत आहे. आज सकाळी स्वतः पोलीस आयुक्तांना ही कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं. या वाहतूक कोंडीतही अनेक वाहन चालक बऱ्याचदा वाहतूक पोलिसांवर दादागिरी करतानाच चित्र पाहायला मिळत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी पुण्यात घडला. यावेळी पोलिसांनी खाक्या दम दाखवत वाहन चालकाची मस्ती चांगलीच जिरवली आणि त्याला शरण येण्यास भाग पाडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलिसांच्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी एका चारचाकी वाहनचालकाला वाहनाला काळ्या काचांबद्दल आणि ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल विचारले. या गोष्टीचा वाहन चालकाला इतका राग आला की, त्याने थेट उर्मट भाषा वापरायला सुरू केली. हा सगळा प्रकार पुण्यातील वारजे भागात २ दिवसांपूर्वी घडला. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी एका चार चाकी वाहन चालकाला अडवल्याचा राग संबंधित वाहन चालकाला आला आणि त्याने पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी खाकी पॅटर्न दाखवल्यानंतर या तरुणांनी हात जोडून माफी मागितली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

शहराचा विस्तार चारही बाजूने होत असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवताना दिसत आहे. अशातच दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडी वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील विमाननगर भागात काही दिवसांपासून वाहतूककोंडीच्या अनेक तक्रारी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाला येत असल्याने नवीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न आता करण्यात आला आहे. आज सकाळी स्वतः पोलीस आयुक्तांना ही कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं.

वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत थेट पुणे पोलिस आयुक्त यांनी काल विमाननगर भागात वाहतुकीचा आढावा घेतला. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यासह पोलिस उपआयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याशिवाय वाहतूक कोंडी फुटावी म्हणून विमाननगर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. असा आदेश वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. या परिसरात एकेरी वाहतूक जाहीर केली आहे.

विमानतळ वाहतूक विभागांतर्गत एकेरी वाहतूक रस्ते

श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक - गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक तर

दुतर्फा वाहतूक सुरू राहणारे मार्ग

सीसीडी चौक → गंगापुरम चौक, दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक, गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM Machine Work Process: मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीन कसे कार्य करते?

Maharashtra Nagar Parishad Live : संतोष बांगर यांच्या कारवाई होणार? आयोगाकडून त्या व्हिडिओची चौकशी होणार

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

Nagaparishad Election : प्रत्येकाने आज ३ ते ४ वेळा मत का द्यावे, वाचा आयोगाने नेमकं काय सांगितलं

Sachin Pilgaonkar Video : "मी 9 वर्षांचा होतो तेव्हा पहिली गाडी घेतली..."; महागुरु सचिन पिळगावकरांचा आणखी एक दावा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT