पुण्यात चारचाकी वाहनाला चक्क 'नो हेल्मेट'चा दंड!
पुण्यात चारचाकी वाहनाला चक्क 'नो हेल्मेट'चा दंड! अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुण्यात चारचाकी वाहनाला चक्क 'नो हेल्मेट'चा दंड!

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: शहर वाहतूक पोलिसांच्या (Pune Traffic Police) अजब कारभारामुळे हसावे का रडावे असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे, त्याचं कारण म्हणजे पुण्यातील (Pune) वाघोली येथील एका कार चालकाला पुणे वाहतूक शाखेच्या वतीने चक्क हेल्मेट नसल्‍याचे नसल्याने पाचशे रुपये दंड ठोठावला आहे! या कारचा नंबर (एम एच12 क्यु बी1007) असा आहे. या दंडाची नोटीस मालकाला पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवाकडून मिळाली आहे.

हे देखील पहा-

वाघोली Wagholi येथे राहणाऱ्या सातव यांना पुणे शहर पोलीस दलातील पुणे शहर वाहतूक शाखेकडून 2018 साली हेल्मेट परिधान न केल्याने पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर त्याच दिवशी सिग्नल वरील व्हाईट पट्टा क्रॉस केल्याप्रकरणी अजून दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतचे नोटिसा त्यांना प्राप्त झाले आहे.

ही नोटीस पाहून सातव यांना हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे. पुणे पोलिसांच्या अशा कारभारामुळे पुणे पोलिस वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, भुजबळांचं PM मोदींना पत्र

Ramdas Athawale: संविधान धोक्यात नाहीतर त्यांचे पक्ष धोक्यात; रामदास आठवलेंची 'इंडिया' आघाडीवर टीका

Today's Marathi News Live : PM मोदींच्या रोड शोला सुरूवात, नागरिकांची मोठी गर्दी

Effects of Garlic in Summer: उन्हाळ्यात लसून खाल्यास होतील 'हे' गंभीर आजार

Effects of Green Tea : डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT