प्लॅन्सच्या किंमती वाढवल्यामुळे #BoycottJioVodaAirtel ट्विटरवर ट्रेंडिंग

जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाने आपल्या प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ केल्याने आता सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत..
प्लॅन्सच्या किंमती वाढल्याने #BoycottJioVodaAirtel ट्विटरवर ट्रेंडिंग
प्लॅन्सच्या किंमती वाढल्याने #BoycottJioVodaAirtel ट्विटरवर ट्रेंडिंगSaam Tv

अलीकडेच, Airtel, Vodafone, Idea ने प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवून त्यांच्या वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याच वेळी, आता जिओने आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत आणि नवीन किंमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील. टेलिकॉम कंपन्यांनी उचललेल्या या पावलामुळे यूजर्स प्रचंड संतापले असून सोशल मीडियावरून त्यांची नाराजी समोर येत आहे. Jio, Airtel, Vodafone Idea प्लॅनच्या किंमती वाढल्यामुळे संतापलेले युजर्स सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. आपले नेटवर्क BSNL मध्ये स्विच करण्याबद्दल बोलत आहेत. #BoycottJioVodaAirtel हॅशटॅग आज ट्विटरवर ट्रेंड करत आहे. जिथे वापरकर्त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते.

#BoycottJioVodaAirtel ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि वापरकर्ते तीव्रपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की कंपन्या आता स्वस्त योजना सांगून ते महाग करत आहेत, जे चुकीचे आहे. काही लोक Jio, Airtel, Vodafone Idea सोडून आता BSNL वर जाण्याबद्दल बोलत आहेत.

Airtel आणि Vodafone Idea ने वाढवलेल्या किमती २६ नोव्हेंबरपासून लागू झाल्या आहेत. म्हणजेच, आता तुम्ही कोणताही प्रीपेड प्लॅन वापरता, तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल. त्याच वेळी, जिओने अलीकडेच आपल्या प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे आणि नवीन किंमती 1 डिसेंबरपासून लागू होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com