Today's Marathi News Live : सेवानिवृत्त ब्रिगेडीयरने शेतकऱ्यांना घाबरण्यासाठी झाडल्या गोळ्या

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (15 may 2024): लोकसभा निवडणूक, राजकारण आणि देश-विदेशासहित राज्यातील प्रत्येक घडामोडी, राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
Marathi News Live By Saam Tv
Aajchya Marathi Batmya Live - 15 may 2024 | Latest Updates on IPL, maharashtra latest news Saam Tv

सेवानिवृत्त ब्रिगेडीयरने शेतकऱ्यांना घाबरण्यासाठी झाडल्या गोळ्या

भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त ब्रिगेडीयरने शेतकऱ्यांवर बंदूकीतून दोन राउंड फायर केलेत. शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी बंदूकीतून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. मागील अनेक वर्षांपासून या ब्रिगेडीयर आणि शेतकरी यांच्यात वाद आहे.

उद्धव ठाकरे यांची उद्या डोंबिवलीत जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांची उद्या डोंबिवलीत जाहीर सभा

पावसामुळे उद्धव ठाकरे यांची सभा रद्द झाली होती

उद्धव ठाकरे उद्या डोंबिवलीतील भागशाळा मैदानावर सभा घेणार

त्यानंतर राजन विचारे यांच्या प्राचारार्थ उद्या संध्याकाळी ठाण्यात सभा

महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था हाताळता न येणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: ओमराजे निंबाळकर

संभाजी महाराज जयंती उत्सवादरम्यान धाराशिवमध्ये लाठीचार्ज प्रकरण

शिवभक्त तरुणांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा

ओमराजे निंबाळकर यांनी केली मागणी

या घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार

महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था हाताळता न येणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

यापूर्वी आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीमार, पुन्हा आंतरवाली सराटी येथे मराठा बांधवावर लाठीचार्ज

हेच का तुमच हिंदुत्व, महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकुमशाही चालू आहे

ओमराजे निंबाळकर यांनी शिवभक्तांवरील लाठीचार्ज प्रकरणी ट्वीट करत केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बंद असलेली मेट्रोसेवा पुन्हा पूर्ववत

बंद असलेली मेट्रोसेवा पुन्हा पूर्ववत

नरेंद्र मोदी यांच्या रोड शो आणि सुरक्षेच्या कारणाने बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरू

घाटकोपर मेट्रो स्टेशन ते जागृतीनगर मेट्रो स्टेशन यादरम्यान ६ नंतर बंद होती मेट्रोसेवा

यादरम्यान मोठ्या प्रमाणात घाटकोपर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली होती

आता मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली

नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरेंची सभा

- नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरेंची सभा

- महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा

- नरेंद्र मोदींच्या पिंपळगावमधील सभेनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष

नाशिकमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो

- नाशिकमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो

- महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी रोड शो

- हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात

- ८ दिवसांत मुख्यमंत्र्यांचा तिसरा नाशिक दौरा

PM मोदींच्या रोड शोला सुरूवात, नागरिकांची मोठी गर्दी 

पीएम मोदींच्या रोड शोला सुरूवात

घाटकोपरच्या एल बी एस रोडवरून रोड शो सुरू

पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

अजित पवार पीएम मोदींच्या रोड शोला गैरहजर

उपमुख्यमंत्री अजित पवार पीएम मोदींच्या रोड शोला हजर राहणार नाहीत

अजित पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते रोड शोला आले नाहीत

PM मोदी घाटकोपरमध्ये दाखल, थोड्याच वेळात रोड शो होणार सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपरमध्ये दाखल

थोड्याच वेळात रोड शोला होणार सुरूवात

महायुतीचे सर्व नेते रोड शोसाठी उपस्थित

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यूंचा आकडा १७ वर

घाटकोपर दुर्घटनामध्ये मृत्यूंचा आकडा १७ वर पोचला

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये ५० तास उलटून गेले

अजून देखील NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा,अग्निशमन दलांकडून बचाव कार्य सुरूच

तर आता पर्यंत ५० टक्के ढिगारा उपसण्याच काम पूर्ण

२५ दुचाकी आणि १० चारचाकी वाहन या ढिगार्‍या खालनं काढले आहेत

याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक याठिकाणी अडकले आहेत,असे एकूण ३ जण अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

जेसीबीच्या साह्याने बचाव कार्य सुरू

आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या सभेचा धडाका, १८ मे रोजी मुंबईत होणार ४ सभा

उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या सांगता सभेचा धुरळा

महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 18 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत 4 सभा

मुंबईतील 4 उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगता सभा उद्धव ठाकरे घेणार

ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये या सभा पार पडणार

पीएम मोदींच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत चार सभा

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली.१४ आणि १५ मे पर्यंत विदर्भातील काही शहरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे..बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. याच ढगाळ वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात तापमान नोंदवले गेले नाही. मे महिन्यात साधारण ४५ अंशाचा घरात तपमान असण्याचा अंदाज असतो. मात्र यंदा ते तापमान नोंदवले गेले नाही.

कॉंग्रेससमोर नकली शिवसेनेने गुडघे टेकले; पंतप्रधान मोदींची टीका 

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी कॉंग्रेससमोर नकली शिवसेनेने गुडघे टेकले असा घणाघात केला आहे.

Mumbai Metro: जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो सेवा बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव जागृती नगर ते घाटकोपर मेट्रो सेवा बंद असणार आहे.

 Sharad Pawar News : शरद पवार नाशिकला पोहोचले, हेलीकॉप्टरने आगमन

शरद पवार नाशिकमध्ये पोहचले आहेत. हेलीकॉप्टरने नाशिकमध्ये आगमन. आज संध्याकाळी वणी येथे शरद पवारांची सभा होणार आहे. हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे शरद पवार पोहचले. शरद पवार २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज वणी तर उद्या सटाणा आणि मनमाडमध्ये शरद पवारांच्या सभा होणार आहेत.

PM Modi Road show : मुंबईत मोदींचा रोड शो, फुगे, ड्रोन, पतंगावर बंदी

मोदींचा रोड शो घाटकोपरमध्ये होणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईत फुगे, ड्रोन, पतंगावर बंदी घालण्यात आली आहे.

Raj Thackeray News : मुंबईमध्ये राज ठाकरेंचा रोड शो होणार?

मुंबईमध्ये राज ठाकरेंचा रोड शो होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदीपाठोपाठ मुंबईत राज ठाकरेंचा रोड शो होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Lok Sabha Election : योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. उज्वल निकम यांचा प्रचारार्थ कुर्ला येथे १८ मे रोजी होणार रोड शो होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार आहेत.

Girish Mahajan :  नाशिकमधील मोदींच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल; गिरीश महाजन यांचा दावा

पंतप्रधान मोदींच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा महायुतीकडेच राहतील, असा गिरीश महाजन यांनी केला आहे.

धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक;  पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळलं

धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ समाज आक्रमक झाला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळण्यात आलंय.

Pune News : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचं निधन

आज सकाळी हृदयाच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

पुण्यातील झोपडपट्टीतून येणाऱ्या पहिल्या महिला महापौर होत्या.

त्रिभुवन यांच्या निधनाच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली.

चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरे यांच्या शीवतिर्थ या निवासस्थानी भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली.

Nashik news:  नाशिकच्या मालेगावात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. नामपूर-मालेगाव रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे. दोन दिवसांपूर्वी राहत्या घरातून 8 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर या मुलीचा मोसम नदी पात्रालगत एका शेतकऱ्याच्या विहिरीत मृतदेह आढळला. यानंतर आरोपी सापडत नाही, तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या रास्ता रोकोमुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

राजस्थानमधील कोलिहान खाणीतून १० अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यास यश

राजस्थानमधील कोलिहान खाणीतून 10 अधिकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या खाणीत आणखी 5 अधिकारी आतमध्ये अडकल्याची माहिती आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढलेल्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

lok Sabha Election : चंद्रशेखर बावनकुळे घेणार राज ठाकरेंची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ठाकरे गटाची मते मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे कशा पद्धतीने वळवता येतील, यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. या आधी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

Nashik News : नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून कांद्याच्या माळा घालून केंद्राचा निषेध

लासलगावात कांद्याच्या माळा घालून केंद्राचा निषेध केला आहे.

यानंतर मुंबई बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकरांसह १०ते १२ जण ताब्यात

मोदींच्या सभेपूर्वी लासलगावी निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Nashik News : नाशिकमध्ये आज PM नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा असणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा होणार आहे. दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवारांची वणीमध्ये सभा होणार आहे. तर नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची नाशिक शहरात जाहीर सभा होणार आहे. तिन्ही नेत्यांच्या सभांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापणार आहे.

ravindra Waikar News : रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

निवडणूक खर्चातील तफावत स्पष्ट करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

hoarding collapse incident : होर्डिंग दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा १५ वर

होर्डिंग दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा १५ वर

होर्डिंग दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १५ झाली आहे.

या होर्डिंग दुर्घटनेत आणखी १० ते १२ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेच्या ४० तासांनतरही मदतकार्य सुरु आहे.

Ghatkopar Fire : होर्डिंग कोसळलेल्या पंपाला लागली आग

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या पंपाला लागली आग

मदत कार्य सुरु असताना पंपाला आग लागली.

अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Amravati Rain : अमरावतीत वादळी पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अमरावती जिल्ह्यातील वरुड, तिवसा तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातलं आहे. वरुड तालुक्यातील पोरगव्हान,आमनेर, घोराडा तर तिवसा तालुक्यातील भारवाडी, ठाणाठुनी चांदुर ढोरे या भागात 549 घरांची पडझड तर अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस पावसाने भिजला,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com