pune navale bridge accident today Saam TV Marathi news
मुंबई/पुणे

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावरील अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमाचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यातील नवले पुलावर वारंवार अपघात होतात

  • या अपघातांनंतर पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला

  • पुणे वाहतूक पोलिसांनी नवीन नियमावली जाहीर केली

  • कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान ४० किमी प्रतितास कमाल वेगमर्यादा लागू केली

  • ४ डिसेंबर २०२५ पासून नवी नियमावली लागू करण्यात आली

पुण्यातील नवले पुलावर अपघातच्या मालिका सुरूच आहेत. या पुलावर नेहमीच अपघात होत असून यामध्ये अनेकांचा मृत्यू होत आहे. नवले पुलावर काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक देत पेट घेतला होता. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. या अपघातानंतर पुणे महानगर पालिका आणि वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळी पाऊलं उचलली जात आहेत. आता पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेत नवीन नियमावली जाहीर केली आहे. कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक करण्यात आली आहे.

कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला. अपघातांना आळा घालण्यासाठी या रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक असल्याने मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1) (2) (बी), 116 (4) व 117 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलिस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा ४० किमी प्रतितास करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये अग्निशमन, पोलिस, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वेगमर्यादेतून वगळण्यात आले आहे.

हे आदेश 4 डिसेंबर 2025 पासून लागू राहणार आहेत. या मार्गावर यापूर्वी वेगमर्यादेबाबत निर्गमित केलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत, रस्त्यावरील बोर्डिंग आणि चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही आणि स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

SCROLL FOR NEXT