Pune Traffic Changes
Pune Traffic Changes  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Changes : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद

Siddhi Hande

आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. हजारो वारकरी पायी विठुरायाच्या दर्शनाला निघाले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीतून प्रस्थान होत आहे. माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मात्र अधिकृतपणे देवस्थान कडून जाहीर करण्यात आले नाही.उद्या या दोन्ही पालख्या पुण्या शहरात येणार असल्याने वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे.

त्यामुळे उद्या पुण्यातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीसाठी बंद राहणाऱ्या रस्त्यांनी माहिती करुन घ्या.

उद्या पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या येणार आहे. त्यामुळे वारकरी मंडळीची गर्दी पुणे शहरात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत काही बदल केले आहेत. पालखी मार्गावरील अनेक रस्ते उद्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तर अनेक मार्गावरील वाहतून वळवण्यात आली आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महारांजाची पालखी उद्या दुपारी पुण्यात दाखल होणार आहे. दुपारी २ नंतर शहरातील अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत.गणेश खिंड रस्ता, एफसी कॉलेड रोज, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

उद्या पालखींचे पुण्यात आगमन झाल्यावर पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडताना वाहतूकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करा, असे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : वारकऱ्यांना टोल माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Breaking News: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; शिंदे सरकारचा निर्णय

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून विधानपरिषदेत खडाजंगी; मुख्यमंत्री शिंदेंना विरोधकांचे ५ मोठे प्रश्न

Riya Sen: बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ लीक, करिअर झालं उद्ध्वस्त; आता कशी दिसते रिया सेन?

Chandsaili Ghat : चांदशैली घाटात पुन्हा कोसळली दरड; सुदैवाने दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT