MHADA Lottery : खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी मुहूर्त ठरला; १९०० घरासाठी या महिन्यात निघणार लॉटरी

MHADA Housing : विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मुंबईतील जवळपास १९०० घरांसाठी लॉटरी जाहिरात तर ऑगस्टमध्ये सदर लॉटरीचा बार उडवण्याची म्हाडाने तयारी सुरू केली आहे.
MHADA Lottery
MHADA LotterySaam Digital
Published On

मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी कधी निघणार याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांना खुशखबर आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेनंतर लागलेली विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मुंबईतील जवळपास १९०० घरांसाठी लॉटरी जाहिरात तर ऑगस्टमध्ये सदर लॉटरीचा बार उडवण्याची म्हाडाने तयारी सुरू केली आहे.

MHADA Lottery
Konkan Railway Mega Block: कोकण रेल्वे मार्गावर ३० दिवसांचा मेगाब्लॉक; कसं असेल वेळापत्रक? कोणत्या स्थानकापर्यंत असणार सेवा?

म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबईतील जवळपास चार हजार घरांची लॉटरी काढली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कोकण मंडळानेही पाच हजार घरांची लॉटरी काढली होती. त्यानंतर लोकसभा, विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागल्याने मुंबईतील घरांची लॉटरी कधी निघणार अशी विचारणा सर्वसामान्य मुंबईकर करत होते. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाने जवळपास १९०० घरांसाठी लॉटरी काढण्याची आणि घरांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे जुलैमध्ये लॉटरीची जाहिरात येईल, तर ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष लॉटरी काढली जाईल अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गोरेगाव हायफाय घरांचा समावेश

म्हाडाने प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर येथे तब्बल ३३२ हायफाय घरांची उभारणी केली आहे. ८०० आणि १००० चौरस फुटांच्या सदनिका असून खासगी विकासकाप्रमाणे त्या बांधल्या आहेत. त्यांचाही या लॉटरीत समावेश केला जाणार आहे. तसेच पहाडी गोरेगाव, विक्रोळी येथील घरांचाही सदर लॉटरीत समावेश केला जाणार आहे.

MHADA Lottery
NIA Raid : मोठी बातमी! नौदलाच्या तळाची पाकिस्तानच्या ISIकडून हेरगिरी; महाराष्ट्रासहित गुजरातमधून 3 संशयितांना अटक

मुंबईकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मुंबई मंडळाकडून जुलै महिन्यात सुमारे १९०० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली जाणार आहे. त्यासाठी घरांची जुळवाजुळव आणि त्यांच्या किमती निश्चित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुंबई मंडळ म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com