Pune Traffic Changes Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune traffic changes during Ganeshotsav 2026: पुण्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. पर्यायी मार्ग कोणते ते घ्या जाणून...

Priya More
  • पुण्यात गणेशोत्सवासाठी ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल

  • पुण्यात १२, १३ आणि १४ सप्टेंबरला वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले

  • पुणे गणपती मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापनेमुळे वाहतूक मार्गात बदल

  • वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सांगितले

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त पुढचे ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यात गणपती मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापनेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. गणेशोत्सवातील गर्दी पाहता शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग आणि पार्किंगच्या व्यवस्थेबाबत सर्व अपडेट पुणेकरांना दिले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गणपती मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापनेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. १२, १३ आणि १४ सप्टेंबर २०२६ हे ३ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत गणपती मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचसोबत सिंहगड रोडवरील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गावर वाहन पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.

पुण्यातील वाहतुकीत बदल कसे असणार आहेत?

१.शिवाजी रोड -

गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद.

पर्यायी मार्ग:

गाडगीळ पुतळा चौक, संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक

शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणारी वाहने स.गो. बर्वे चौक, जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक, टिळक

चौक

झाशी राणी चौक- खुडे चौक डेंगळे जाणारी वाहने पूल मार्गे कुंभारवेसकडे

मंगला सिनेमा लेन - कुंभारवेस /प्रिमीयर गॅरेज चौक, शिवाजीपुल चौक, गाडगीळ पुतळा चौक, कुंभारवेस चौक

२. सिंहगड रोड

सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू राहील. मात्र या मार्गावर पार्किंग करण्यास मनाई आहे.

पार्किंग व्यवस्था:

- मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा

- जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक- रस्त्याच्या डाव्या बाजूस

- निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन

३. केशवनगर, मुंढवा

शिवाजी महाराज चौक, केशवनगर मांजरीकडे जाणारी वाहने मांजरी रोडने न जाता गायरान वस्ती रोड, विहान सोसा रोड मांजरी रोड मार्गे जातील.

खराडी ब्रिजकडून येणारी वाहने

रेणुका माता मंदिर, विहान सोसा रोड, शिवाजी महाराज चौक, रेणुका माता मंदिर

प्रवेश बंद -

मुंढवा चौक-शिवाजी चौक ते कल्याणी बंगला रोड तसेच शिवाजी चौक ते झेड कॉर्नर, केशवनगर परिसरात जड वाहनांना प्रवेश बंद राहिल.

गणपती मूर्ती खरेदीसाठी पार्किंग व्यवस्था -

- न्या. रानडे पथ - कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा

- वीर संताजी घोरपडे पथ - म.न.पा. बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक

- टिळक पूल ते भिडे पूल - नदीपात्रातील रस्ता

- मंडई येथील मिनर्व्ह व आर्यन पार्किंग तळ

- शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक फक्त रस्त्याच्या डाव्या बाजूस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

Maharashtra News Live Update: आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद

SCROLL FOR NEXT