Devendra Fadnavis action on Pune toxic liquor case Saam TV Marathi
मुंबई/पुणे

हयगय नको...! पुण्यातील मृत्यू तांडवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर, थेट पोलिसांना महत्त्वाचे आदेश

Pune toxic liquor case, Devendra Fadnavis orders : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असून तपास वेगाने सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Devendra Fadnavis action on Pune toxic liquor case : विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे. मुख्य आरोपीसह पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाची दखल थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसय यांनी घेतली आहे. हे मृत्यू नसून हत्याच असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय या प्रकरणात कोणतीही हयगय करू नका.. कुणाचाही हात असो तपास कठोर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मागील ४८ तासांत पुणे जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे. विषारी दारूमुळे हाहाकार माजलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ७ तर पुण्यात ५ जण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. हयगय करू नका. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असे थेट आदेश त्यांनी दिले आहेत.

ही घटना अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. याप्रकरणी माझे पुणे व पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. दारू कुठे तयार झाली याचा छडा पोलिसांनी लावला असून मुख्य आरोपींसह आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामागे असणारी संपूर्ण साखळी (Ecosystem) शोधून काढण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून पोलीस व उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) संयुक्तपणे कारवाई करत आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विषारी दारू कुठं तयार झाली, याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. यामागे असणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आणखी काही लोक यामध्ये असू शकतात, त्यांचा शोध घेतला जात आहे. ही घटना गंभीर आहे. या विषारी दारूमागे कोण कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे. साखळी शोधली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा प्रकार म्हणजे एक प्रकारे 'हत्याच' असल्यामुळे आरोपींवर अतिशय कठोर कलमे लावण्यात आली आहेत. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन ते पूर्णपणे संपवले जाईल. सध्या जे लोक गंभीर (Serious) आहेत, त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत देऊन त्यांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार, ही दारू तयार करण्यासाठी 'मिथेनॉल' (Methanol) सारख्या घातक केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्यात आल्याचे समोर येत आहे, मात्र पोलीस यावर अधिकृतपणे सविस्तर माहिती देतील, असे त्यांनी सांगितले.

पिंपरीत ७ जणांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू प्राशन केल्याने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर तीन जणांचे प्रकृती चिंताजनक आहे अशी अधिकृत माहिती पिंपरी-चचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तींचे विसेरा हे फॉरेन्सिक रिपोर्ट साठी राखून ठेवण्यात आले आहेत. तसेच तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलवण्यात आलं आहे. आणि विषारी दारू विकणाऱ्या पाच - सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्यांच्याकडे पुढील तपास करण्यात येत आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT