Pune News Lonavala x
मुंबई/पुणे

Pune News : पवना डॅम, कार्ला लेणी, एकविरा देवी, लोहगडसह पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात बंदी, कारण काय?

Pune Latest News : पावसाळ्यात लोणावळ्यासह पुण्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना अनेकजण भेट देतात. पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर गर्दी पाहायला मिळते. गर्दीमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी शासनाने काही उपाययोजना केल्या आहेत.

Yash Shirke

Pune : राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी लोणावळ्यात नागरिक येत असतात. पावसाळ्यात तर लोणावळ्यात फिरण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण यामुळे लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पवना डॅम, कार्ला लेणी, टायगर पॉईंटसह अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून पर्यटनावर ७ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशामधील

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम अशी वर्षाविहार पर्यटनासाठी प्रसिध्द ठिकाणे आहेत. सध्या पावसाळा सिझन सुरु झालेला असून देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा व परिसरात भेट देण्यासाठी येत आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी होवू नये याकरता पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांकडे जाणारे सर्व रस्त्यांची पहाणी केलेली असून, शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवशी लोणावळा परिसरात बाहेरुन येणारे पर्यटक यांचेमुळे वाहतुक कोंडी होवू नये याकरीता खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकाराता येत नाही. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्याबाबत त्यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश पारित होणेबाबत विनंती केली आहे.

तसेच पवना डॅम परिसरामध्ये पर्यटक पर्यटनासाठी येत असतात पर्यटक हे डॅमचे पाण्यामध्ये उतरुन पाण्याचा अंदाज न आल्याने आजपर्यंत डॅममध्ये १५ व्यक्ती बुडून मयत झालेले आहेत. तसेच मौजे आतवण ता. मावळ जि पुणे येथील टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, पवाना डॅम तसेच भाजे धबधबा येथे पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी चोरी व जबरी चोरीचे एकूण ०४ गुन्हे दाखल झालेले आहेत. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डोंगरावर गेलेले पर्यटक हे अचानक पाऊस आल्याने वाहुन जावून त्यामध्यू सहा पर्यटक मयत झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीकोनातुन सदर बाबींवर प्रतिबंध घालणे अत्यंत आवश्यक आहे.

एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असून त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याची बाब निदर्शनास आणून दिलेले असून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ प्रतिबंधात्मक आदेश लागू होणेबाबत तशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी. जितेंद्र डूडी, जिल्हादंडाधिकारी, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये पुणे जिल्हयातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम येथील प्रामुख्याच्या ठिकाणी पावसाळयातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दि.०७/०६/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे.

१. पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे व पोहणे.

२. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.

३. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, द-याचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरणे करणे.

४. पाससामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.

५. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.

६. वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालविणे.

७. वाहनांची ने आण करताना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.

८. सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.

९. सार्वजनिक ठिकाणी येणा-या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

१०. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगित यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, गाडीतील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.

११. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

१२. धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे. (आत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून).

सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT