BMC 2025 election full ward structure explained : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई वगळता राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेत २२७ एकसदस्यीय प्रभागांनुसार निवडणुका होणार आहेत.
मुंबईत पूर्वी २२७ प्रभाग होते. महाविकास आघाडी सरकारने ही संख्या वाढवून २३६ केली होती. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा २२७ प्रभागांचा निर्णय घेण्यात आला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबईत जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील.
अ ब आणि क वर्ग महापालिका प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या शहरांचा ब वर्गात तर नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या शहरांचा क वर्गात समावेश करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.