Pune City Traffic Reasons Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic : १० मिनिटांसाठी अर्धा तास, पुण्यात इतकी वाहतूक कोंडी का? तज्ज्ञांनी सांगितला ट्रॅफिक जामवरील उतारा

Pune City Traffic News : जगभरात वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या शहरांच्या यादीत पुणे चौथ्या स्थानी आहे. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका गंभीर का झाला आहे हे सविस्तरपणे जाणून घ्या.

Yash Shirke

अक्षय बडवे साम प्रतिनिधी

Pune Traffic : पुणे शहराचा चहूबाजूंनी विस्तार होत आहे. विस्तारासह पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण अहवालानुसार, पुण्यात १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ३३ मिनिटे आणि २२ सेकंद लागतात. यावरुन पुणेकरांसाठी वाहतूक कोंडीची समस्या किती गंभीर बनली आहे याचा अंदाज येतो. पण पुण्यात ही समस्या का वाढत आहे, जाणून घ्या..

‘टॉम-टॉम’ या डॅनिश संस्थेने जगभरातील विविध देशांतील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण करण्याचे काम करते. या संस्थेने मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये जगभरातील वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या शहरांची नावे शोधण्यासाठी संबंधित शहरांमध्ये १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो असे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या यादीत पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेट्रोचे विस्तारीकरण, उड्डाणपुलांची कामे, रस्त्यावरील खड्डे यांसारख्या अनेक कारणांमुळे पुण्यात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे.

जगातील शहरांत १० किलोमीटर अंतरासाठी लागणारा वेळ -

१. बरानकिला (कोलंबिया) : ३५ मिनिटे, ६ सेकंद

२. कोलकाता (भारत) : ३४ मिनिटे, ३३ सेकंद

३. बंगळुरु (भारत) : ३4 मिनिटे, १० सेकंद

४. पुणे (भारत) : ३३ मिनिटे, २२ सेकंद

५. लंडन (इंग्लंड) : ३३ मिनिटे, १७ सेकंद

पुण्यातील वाहतूक कोंडीमागे काय कारण आहे आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतात यावर वाहतूक तज्ज्ञांनी त्यांची मतं मांडली आहेत.

परिसर संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांच्या मते, वाहतुकीच्या धोरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर विशेषत: शहरातील बससेवा यांच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. खासगी वाहनांची संख्या कमी करुन सार्वजनिक वाहतूक वाढवायला हवी. वाहतूक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी देखील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण खासगी वाहनांची वाढती संख्या आहे असे म्हटले आहे. त्यांच्या मते, पुणे शहरातील रस्त्यांची रुंदी वाढवणे, फुटपाथची डागडुजी करणे, सार्वजनिक वाहतूक वाढवणे, टाऊन प्लॅनिंग करणे, मेट्रोचे जाळे वाढवणे अशा गोष्टी राबवल्याने वाहतूकीचा भार कमी होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT