Pune News: पुण्यातील अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर, गाडी फुटपाथवरून दुकात गेली, पाहा व्हिडीओ

Pune Crime News: कारचे नियंत्रण सुटल्याने ती थेट टिळक रोडवर मोठा अपघात घडल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
crime news
crime newsSaam tv
Published On

भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने ती थेट टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात घुसली. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. कार बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाचे नाव शौकत कमलाकर बेळ (वय १९, हडपसर, काळेपडळ) असे आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास, शौकत बेळ याच्या कारचे नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवरून महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकानात घुसली. या घटनेत दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. गाडीमध्ये चालकासोबत त्याचे दोन मित्रही उपस्थित होते. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांनंतर चालकाने मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. अपघातामुळे दुकानासह परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

crime news
Mahakumbh Mela 2025: संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव

कारचा वेग इतका जोरात होता की ती फुटपाथवरुन दुकानात घुसली. त्यात दुकानाचे शटर तोडले. त्याच्या आतमध्ये असलेली काच फुटली. पोलिसांनी शौकत कमलाकर बेळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानात रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुकानात ठेवलेले २८ फ्रीज, लॅपटॉपचे तब्बल ११ लाख ५२ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले.

crime news
Viral Video: गाजर हलव्यापासून सँडविच, तुम्ही कधी पाहिलेय का? पाहा व्हायरल VIDEO

अपघातानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये चालकाने भरधाव कार थेट दुकानात घातली आणि नंतर स्वतःच क्रेन बोलावून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले आहे. मात्र, जागरूक नागरिकांनी दुकानदाराला याची माहिती दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

crime news
Makar Sankranti 2025: मकरसंक्रांत या शब्दाचा अर्थ काय? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com