Vande Bharat Express Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat Express: पुण्याला मिळणार आणखी ४ वंदे भारत, कुठून कुठपर्यंत धावणार; ही ४ शहरं आणखी जवळ येणार

Pune Vande Bharat Trains: २८ डिसेंबर २००४ रोजी रेल्वे प्रशासनाने पुण्याहून ४ नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. या घोषणेनंतर पुण्यातील एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ६ होईल.

Priya More

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आता ४ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. सध्या पुण्यातून २ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. येत्या काही दिवसांत पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण ६ वंदे भारत एक्स्प्रेस येणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी ४ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२८ डिसेंबर २००४ रोजी रेल्वे प्रशासनाने पुण्याहून ४ नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. या घोषणेनंतर पुण्यातील एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ६ होईल. या नव्या ४ वंदे भारत एक्स्प्रेसमुळे आणखी ४ नवी शहरं पुण्याच्या जवळ येणार आहेत. पुणेकरांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देत कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.

पुण्यामध्ये सध्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर या २ वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. त्याचसोबत मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुणे मार्गे चालवण्यात येते. चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याला जोडण्यात येणार असल्यामुळे इतर अनेक गंतव्यस्थानांच्या प्रवासाचा वेळ कमी होईल ज्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळेल.

पुण्यातून नव्याने धावणार असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस कुठपर्यंत असणार आहे याची माहिती समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या मार्गांवर धावतील. या वंदे भारत एक्स्प्रेस नेमक्या कधीपासून सुरू करण्यात येणार याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाही. पण ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे पुणेकरांना चांगलाच फायदा होणार आहे.

सध्या पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांच्या किमती मार्ग आणि कोचच्या प्रकारावर अवलंबून आहेत. म्हणजेच, पुणे-कोल्हापूर मार्गावर एका स्टँडर्ड सीटसाठी ५६० रुपये मोजावे लागतात. तर विशेष कोचच्या तिकिटाची किंमत १,१३५ रुपये आहे. ही ट्रेन आठवड्यातून तीन वेळा बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावते. पुणे-हुबळी मार्गावर स्टँडर्ड सीटसाठी १,५३० रुपये आणि स्पेशल कोचसाठी २,७८० रुपये मोजावे लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT