Vande Bharat: वंदे भारत स्लीपर लवकरच धावणार, कोचमधील Inside फोटो आले समोर; ट्रेनमध्ये खास काय? जाणून घ्या

Vande Bharat Sleeper Coach: वंदे भारत स्लीपर कोच लवकरच प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. या स्लीपर कोचचे फोटो समोर आले आहे. वंदे भारत स्लीपर कोचमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स मिळणार आहेत.
Vande Bharat
Vande BharatSaam Tv
Published On

वंदे भारत ही देशातील सर्वात जास्त वेगवान ट्रेन आहे. वंदे भारतमुळे आपण कोणत्याही ठिकाणी खूप कमी वेळात पोहचू शकतो. त्याचसोबत प्रवाशांच्या सुख-सुविधांची सर्व काळजी घेतली जाते. देशातील वेगवेगळ्या भागातून वंदे भारत ट्रेन चालवली जाते. आता या ट्रेनमध्ये नवीन अपडेट येणार आहे. वंदे भारत स्लीपर कोच लवकरच सुरु होणार आहे.(Vande Bharat Sleeper Coach)

Vande Bharat
PF Rules: नवीन नोकरी जॉइन केल्यावर जुन्या PF खात्याचे काय होणार? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

वंदे भारत स्लीपर कोच हे लांबच्या प्रवासासाठी चालवण्यात येणार आहे.त्यासाठी कोचदेखील तयार करण्यात आला आहे. या वंदे भारत स्लीपर कोचचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील मिशन रफ्तारचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मिशन रफ्तारअंतर्गत वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन १८० किमी वेगाने धावणार आहे. यामध्ये पहिली ट्रेन १६० च्या वेगाने चालवली जाईल. त्यानंतर ट्रेनचा वेगचा वाढवा जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर कोचची चाचणी कोटा येथे होणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वंदे भारत स्लीपर कोचमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. वंदे भारत स्लीपर कोच तयार आहे. त्याची चाचणी कोटा येथे होऊ शकते. वंदे भारत स्लीपर कोच BEML द्वारे तयार केले जाते. सध्या या ट्रेनची सुरक्षा चेक केली जात हे. त्यानंतर फील्ड ट्रायल घेतली जाईल आणि प्रवाशांसाठी चालवली जाईल. (Vande Bharat News)

Vande Bharat
Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरे मैदानात; महायुती सरकारकडे केली मोठी मागणी, पाहा VIDEO

वंदे भारत स्लीपर कोचचे फीचर्स (Vande Bharat Sleeper Coach Features)

वंदे भारत स्लीपर कोच युरोपियन देशाच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. या ट्रेनला १६ डबे असणार आहे. ज्यात 11 3 AC, 4 2 AC आणि १ फर्स्ट क्लास AC कोच आहे.तसेच या ट्रेनमध्ये बायो टॉयलेट्स बनवण्यात आले आहेत. प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.या ट्रेन कवच इन्स्टॉलेशन केले जाणार आहे. याचसोबत आप्तकालीन परिस्थितीत थेट ट्रेन मॅनेजर आणि लोको पायलटशी संपर्क करण्यासाठी सिस्टीम बनवण्यात आली आहे. याचसोबत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Vande Bharat
PPF Scheme: ५०,००० गुंतवा अन् १६ लाख रुपये मिळवा, पोस्टाची भन्नाट योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com