Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पालखी सोहळ्यासाठी आला, फोटो काढताना तोल गेला अन् १६ वर्षीय वेदांत मुळा नदीत पडला, पुढे...

Pune News : पुण्याच्या दापोडी येथे १६ वर्षीय मुलगा मुळा नदीच्या पाण्यात पडला. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला पाण्यातून काढून त्याचे प्राण वाचवले.

Yash Shirke

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील दापोडी येथील पुलावरुन एक १६ वर्षीय मुलगा अचानक मुळा नदी पात्रात पडला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड व खडकी कॅन्टोन्मेंट ॲम्युनिशन अग्निशमन दलाकडून अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी बोटीच्या सहाय्याने रशी आणि लाईफ जॅकेट वापरत अडकलेल्या मुलाची सुखरुप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत बोत्रे (वय १६) असे मुळी नदी पात्रात पडलेल्या मुलाचे नाव आहे. वेदांत हा दापोडी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दर्शनासाठी आला होता. त्यादरम्यान मुळा नदीच्या पुलावर उभा असताना वेदांतचा तोल गेला आणि तो नदीपात्रात कोसळला. वेदांत पालखीचा फोटो काढण्यासाठी पुलावर गेला असताना ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी तो नदीच्या पुलावर गेला होता. वेदांत फोटो स्टंट करण्याकरता गेला असता तोल जाऊन पुलावरुन नदीपात्रात पडल्याचे म्हटले जात आहे. मुळा नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. तसेच नदीपात्रात पूल बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या कॉलममध्ये वेदांत पडला होता. त्यामुळे त्याला पाण्यातून बाहेर काढणे कठीण होते.

या प्रकरणाची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने मोटरबोटीने लगेच नदीपात्रात उतरुन वेदांत बोत्रेचे प्राण वाचवले आणि त्याला आईवडिलांच्या स्वाधीन केले. गौतम इंगवले, विकास नाईक, रुपेश जाधव, प्रथमेश भोसले, विशाल चव्हाण, आविष्कार पिराळ आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वेदांतचा जीव वाचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Shower Benefits: शांत झोप आणि दीर्घायुष्याचं सिक्रेट! रात्री आंघोळ करण्याचे फायदे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता

Mahadhan Rajyog: 16 डिसेंबर रोजी या राशींचं नशीब पलटणार; ग्रहांचा राजा सूर्य बनवणार शक्तीशाली योग

Mix Sprouts Bhel Recipe: मोड आलेल्या कडधान्यांची पौष्टिक भेळ कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT