Pune : मावळातील कारला फाट्यावर 'टेक्निकल अर्बनीझम'; अपघाताला बसणार आळा SaamTVnews
मुंबई/पुणे

Pune : मावळातील कारला फाट्यावर 'टेक्निकल अर्बनीझम'; अपघाताला बसणार आळा

अपघाताला रोखणारा काय आहे हा प्रयोग? वाचा

दिलीप कांबळे

मावळ :  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चौकाचौकावरील जीवघेण्या अपघातांची संख्या कमी करण्यासह शून्य मृत्युदरासाठी सेव्हलाईफ फाउंडेशन प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी कारला फाटा येथे भारतातील पहिली टेक्निकल अर्बनिझमचा (Technical urbanism) प्रयोग केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्कोडा ऑटो फोक्सवँगन व सेव्हलाईफ फाउंडेशन यांच्या सहकार्याने कार्ला फाटा येथे रस्ता क्रॉसिंग अधिक सुरक्षित करत व मार्गाची पुनर्रचना करत टेक्निकल अर्बनिझमच्या चाचण्या सुरु केल्या आहेत.

हे देखील पहा :

महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांना वळण्यासाठी किंवा मार्गास छेद दिल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामंडळाकडून काही ठिकाणचे असुरक्षित छेदरस्ते बंद केले. मात्र, गावांच्या ठिकाणी असलेल्या छेद दुभाजकांमुळे झालेल्या अपघातात अनेक दुर्दैवी नागरिकांचे बळी गेले आहेत. पादचारी, सायकलस्वार आणि वाहन चालकांसाठी रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी रस्त्यांची शहरी रचना, वाहतूक नियोजन आणि पायाभूत सुविधांमधील बदलांसाठी, सेव्हलाईफ फाउंडेशन तर्फे पुढाकार घेण्यात आला. महामार्गावरील छेद रस्त्यांचा दोन वर्षे अभ्यास करून सर्वेक्षण करण्यात आले. असे मत करुणा रैना डायरेक्टर (सेव्ह लाईफ फाउंडेशन) यांनी व्यक्त केला. 

कारला फाट्यावर एका तासात सरासरी अडीचशे पादचारी रस्ता ओलांडतात. चार हजार पाचशे वाहने पास होतात. 2018 ते 2020 या कालावधीत अठरा गंभीर अपघात झाले. यामध्ये सतरा नागरिकांचा मृत्यू तर तेवीस गंभीर जखमी झाले. कारला फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर पादचाऱ्यांना थांबण्यासाठी जागा नव्हती. आणि महामार्गावरील जंक्शन गावकरी वापरत असल्याने संघर्ष मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, सेव्ह लाइफ फाउंडेशन ने हा उपक्रम हाती घेतला तो खरच चांगला आहे. मात्र हे होत असताना कारले फाट्यापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत दिशादर्शक फलक लावण्यात यावे जेणेकरून ताशी अंशी ते शंभर स्पीडने वाहन चालवताना त्यांना पुढे दिसेल आणि अपघात वाचेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Accident: घराकडे जाताना भयंकर घडलं, भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

Thursday Horoscope: महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, या ४ राशीच्या पैशाच्या समस्या होतील दूर, वाचा गुरुवारचे राशी

Rohit Sharma: वनडे क्रिकेटबाबत BCCIची रोहित शर्माला ताकीद; वॉर्निगनंतर 'हिट-मॅन'चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT