PUNE TEACHERS CONSTITUENCY ELECTION saam tv
मुंबई/पुणे

भाजपविरोधात बंडखोराला शिंदेसेनेचा पाठिंबा? पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस वाढणार

Maharashtra MLC Elections: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आलाय. भाजप उमेदवारासमोर अपक्ष उमेदवाराचं कडवं आव्हान उभं राहिलंय. विशेष म्हणजे, या बंडखोर उमेदवाराला शिंदेसेनेनं छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा रंगलीये. त्यामुळे पुण्यात महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चांना कसं उधाण आलंय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची तारीख उलटल्यानंतरही उमेदवारांच्या पाठिंब्यावरून राजकारण रंगलंय. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निव़णुकीत महायुतीत नवा ट्विस्ट आलाय़. शिंदेसेनेनं आपला अधिकृत उमेदवार मागे घेतल्यानंतर आता अचनाक आपल्याच पक्षातल्या बंडखोराला भाजपविरोधात पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपकडून कौस्तुभ गावडे मैदानात आहेत. तर शिंदेसेनेकडून इच्छुक असणाऱे सचिन सानप अपक्ष रिंगणात आहेत. आता शिंदेसेनेना सचिन सानप यांना पाठिंबा देण्य़ाच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महायुतीतच मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झालीय. तसे संकेत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी दिले आहेत.

हीच रणनीती ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं झाली. विशेष म्हणजे या बैठकिला बंडखोर उमेदवार सचिन सानपही उपस्थित होते. त्यामुळे या चर्चांना आता बळ आलंय.

शिंदेसेनेनं सचिन सानपांना अधिकृत पाठिंबा दिल्यास भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणे दौऱ्यात भाजप उमेदवारासोबत चर्चा केल्याचं समजतंय. सचिन सानप निवडणूक लढण्यावर ठाम असले तरी मतदानाच्या दिवसापर्यंत काय खलबतं होतात याबाबत उत्सुकता कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलने, निदर्शने, सभांना परवानगी देण्यात येऊ नये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचा प्रस्ताव

IDBI बँकेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; बँकेतील हिस्सेदारी विकणार,कोणत्या कंपनीसोबत झाला 52,877 कोटींचा करार?

Cold Drinks Facts : कोल्ड्रिंक्सची बाटली उघडताच बुडबुडे का येतात? ९०% लोकांना माहिती नाहीत ही कारणे

दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत, संपूर्ण मदत कधी मिळणार? स्पेशल रिपोर्ट

Aadhaar-PAN मध्ये तुमचा पत्ता बदलायचा आहे का? घरबसल्या असं करा अपडेट

SCROLL FOR NEXT