pune news  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात नव्या गाडीचे पेढे जीवावर उठले, खाल्ल्यानंतर ७ जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंनी अवघ्या ४ मिनिटांत दिले कारवाईचे आदेश

tukaram mundhe news : पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर ७ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

Akshay Badve

पुण्यात पेढ्यातून ७ जणांना विषबाधा

वडगाव शेरी आणि विमाननगर भागात घडली घटना

७ जणांना विषबाधा झाल्याने अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नवीन गाडी घेतल्यानंतर वाटलेल्या पेढ्यांतून सात जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश सुद्धा आहे. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी आणि विमाननगर भागात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरीतील एका रहिवासी इमारतीत एका व्यक्तीने नवीन दुचाकी खरेदी केली. या निमित्ताने त्यांनी जवळच्या मिठाईचे दुकान असलेल्या गुरुनानक स्विट्स मधून पेढे खरेदी केले आणि आपल्या ओळखीच्या आणि नातेवाईकांना वाटले.

यातील नातेवाईकांच्या बाजूने असलेल्या अँड अश्विनी शेवाळे यांनी माहिती दिली. शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पेढे स्थानिक मिठाईच्या दुकानातून विकत घेतले होते. ते सात जणांनी खाल्ले असता त्यांना उलट्या होऊ लागल्या. यातील रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून यातील एक जण आय सी यू मध्ये आहेत. या सगळ्या प्रकरणी शेवाळे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह एफ डी ए चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.

तुकाराम मुंढे यांना एक मेसेज अन् ४ मिनिटांत कारवाई

संबंधित प्रकरणात एका महिलेने एफ डी ए चे आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. प्रकरणाची माहिती घेताच तुकाराम मुंढे यांनी तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

आयुक्तांचा आदेश मिळताच एफडीए चे पुणे विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले. अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने संबंधित रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर ज्या स्थानिक मिठाईच्या दुकानातून हे पेढे खरेदी केले होते, तिथे छापा टाकून तपासासाठी पेढ्यांचे नमुने जप्त केले. हे पेढे नेमके कशामुळे आणि कधी बनवले गेले? त्यात कुठले रासायनिक भेसळ होती का याचा काही दिवसात अहवाल आल्यावर सगळं स्पष्ट होईल.

यावर एफ डी ए ने संबंधित गुरुनानक स्विट्स नावाच्या मिठाईचे दुकान पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही संबंधित पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत त्या संदर्भातील अहवाल प्राप्त होताच आम्ही पुढील योग्य कारवाई करू अशी माहिती एफ डी ए चे सह आयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिली आहे.

...तर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणारच

पुण्यातील चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २ दिवसांपूर्वी घडला. संबंधित घटनेची प्राथमिक माहिती आम्ही मिळवली आहे. सध्या या प्रकरणातील रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसचं पेढ्यांचे नमुने एफ डी ए यांच्याकडे तपासणीसाठी गेले आहेत. त्याचा अहवाल जेव्हा येईल आणि त्यात त्रुटी आढळून येतील त्यावेळी तात्काळ कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT