Security Guards Assault Youth in Nanded City Pune  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: वाहनाला सोसायटीचे स्टिकर नसल्याने अडवले, सुरक्षारक्षकांकडून तरुणाला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

Security Guards Assault Youth in Nanded City: पुण्यातल्या नांदेड सिटीमध्ये वाहनाला स्टिकर न लावल्याच्या कारणावरून सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील प्रसिद्ध सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध नांदेड सिटीमध्ये ही घटना घडली. मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांने वाहनाला स्टिकर नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण केली. सुरक्षारक्षकाने आधी वाहनाला स्टिकर नसल्यामुळे फ्लॅट मालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर जाब विचारायला गेलल्या मुलाला मारहाण केली.

पुण्याच्या नांदेड सिटीमध्ये हा सगळा प्रकार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडला. याप्रकरणी तरुणाच्या ४२ वर्षीय आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. याप्रकरणी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या नवरा आणि २ मुलांसह नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या १० वर्षांपासून राहतात. फिर्यादी महिलेचा नवरा रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता फिर्यादी यांचा नवरा घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आला. त्याठिकाणी नांदेडसिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले.

सुरक्षा गार्डने आपल्या नवऱ्याला थांबवून ठेवल्यामुळे फिर्यादी हे त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून गेटवर गेले. यावेळी गेटवर फिर्यादी यांच्या नवऱ्यासोबत तेथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होता.

हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला तर त्याचा सुद्धा त्याठिकाणी जमा झालेल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाले. या भांडणामध्ये ८- १० सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT