Traffic Policeman Brutally Beaten by Truck Driver Saam Tv
मुंबई/पुणे

ट्रक थांबवला, चालकाची सटकली, ड्युटी बजावणाऱ्या पोलिसाला भररस्त्यात हाणलं; पुणे हादरलं

Traffic Policeman Brutally Beaten by Truck Driver: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात खाकीवर हात. वाहतूक हवालदारावर ट्रक चालकाकडून मारहाण.

Bhagyashree Kamble

पुणे शहरात गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. वाहतूक पोलिसावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही भयंकर घटना मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. वाहतूक नियंत्रण करत असताना हवालदारावर ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महेश सुभाष साळुंखे (वय वर्ष ३९) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सुमीत सुभाष सरकटे (वय वर्ष ३४), अक्षय़ नानासाहेब शिंदे (वय वर्ष ३०) आणि मनजीत कांबळे (वय वर्ष २८) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात महेश साळुंखे यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली. वाहतूक पोलीस हवालदार हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (ता.१७) साडेदहाच्या सुमारास हवालदार साळुंखे ड्युटी संपवून घरी परतत होते. त्याचवेळी मार्केट यार्ड परिसरात एक ट्रक प्रचंड वेगाने येत होते. साळुंखे यांनी ट्रक चालकाला अडवले. नागरीक आणि ट्रक चालकामध्ये बाचाबाची झाली. साळुंखे यांनी हस्तक्षेप केला. ट्रक चालकाने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतलं. तसेच हवालदारावर हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नंतर त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Asrani: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बडे सरकारी अधिकारी निलंबित, काय आहे प्रकरण?

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT