Digital Home Arrest Scam Claims Life of Elderly Man in Pune Saam
मुंबई/पुणे

डिजिटल होम अरेस्टच्या नावाखाली फसवलं, १ कोटी लुबाडले, पुण्यातील वृद्धाचा हृदयविकारानं मृत्यू

Digital Home Arrest Scam Claims Life of Elderly Man in Pune: 'डिजिटल होम अरेस्ट'च्या नावाखाली ८० वर्षीय वृद्धाची फसवणूक. १कोटी ११ लाख रूपये लुबाडले. वृद्धाचा हार्ट अटॅकनं मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • "डिजिटल होम अरेस्ट"मध्ये झालेल्या फसवणुकीतून वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू.

  • मनी लॉन्ड्रींगच्या कारवाईची भिती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक.

  • १ कोटी १९ लाखांची लुबाडले.

  • सप्टेंबर महिन्यात तक्रार नोंदवून सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल.

  • ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यावर पुणे सायबर पोलिसांनी घेतली दखल.

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुण्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. डिजिटल होम अरेस्टच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केलीये. तब्बल १ कोटी १९ लाख रूपये लुबाडले. या घटनेचा मानसिक आणि आर्थिक धक्का बसल्यानं संबंधित वृद्ध व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

या संपूर्ण प्रकरणी एका ८० वर्षीय महिलेने पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती पुण्यातील टिंगरे नगर परिसरात गेल्या २५ वर्षांपासून राहत होते. त्यांना तीन मुली असून, त्या विदेशात असल्याची माहिती आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर ते पेन्शन खात्यातून पैसे काढून ते उदरनिर्वाह चालवत होते.

ऑगस्ट महिन्यात सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला फोन करून कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचं सांगितलं. एका व्यक्तीने करोडो रुपयांचा गुन्हा केला असून त्यात तुमच्या नावाने एका बँकेत खाते बनवले असून हा व्यवहार त्यातून झाले असल्याचं खोटं सांगितलं.

मानवी तस्करीमध्ये तुमचा सहभाग असल्याने तुम्हाला नोटीस पाठवणार आहोत, अशी बतावणी करत सायबर चोरट्यांनी एका दुसऱ्या नंबरवरून सी बी अधिकारी बोलत असल्याचं सांगितलं. तसेच तुम्हाला अटक होणार आहे, पण तुम्हाला जेल अरेस्ट का होम अरेस्ट पाहिजे असं विचारलं.

अटकेला घाबरुन 'होम अरेस्ट द्या', असे या ज्येष्ठ नागरिकाने सांगितलं. तेव्हा सायबर चोरट्यांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला. बँक खात्याची पडताळणी करायची असल्याचे सांगत त्यांच्या बँक खात्यातून १ कोटी १९ लाख रुपये ट्रान्सफर केले. सायबर पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीने २२ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. तसेच ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तक्रार दिली.

अटकेची भिती इतकी त्यांच्या मनावर होती. शिवाय तुम्ही कोणाला काही सांगितले तर, तुमच्या मुलीला त्रास होईल अशी भिती घातली होती याच भीतीने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तिथे सुद्धा त्यांना फी भरण्यासाठी पैसे उरले नव्हते, अखेर त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता राजसेना विरूद्ध शिंदेसेना, 'गडकिल्ल्यांवरील नमो सेंटर फोडणार'

Sanjay Raut : मोठी बातमी! PM मोदींनंतर CM फडणवीसांकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस,VIDEO

ठाकरे बंधू आयोगाला कोर्टात खेचणार? मतदार याद्यातील घोळावरुन ठाकरे आक्रमक

Health Tips: 'या' कारणांमुळे झोप पूर्ण झाल्यानंतरही जाणवतो थकवा

Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, ठाकरेसेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली

SCROLL FOR NEXT