Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! कात्रीने गळा चिरून पत्नीची हत्या, मुलासमोर धक्कादायक कृत्य; व्हिडीओ केला व्हायरल

Pune Police: पुण्यातल्या खराडीमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. कात्रीने पत्नीवर सपासप वार करत हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये कात्रीने गळा चिरून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने आपल्या मुलासमोरच हे धक्कादायक कृत्य केले आहे. पुण्यातील खराडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. पतीने पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नीला संपवले. पत्नीचा हत्या करून पती पोलिस ठाण्यात हजर झाला. खराडी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

घरगुती वादातून आणि चारित्र्याच्या संशयावरून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने घरामध्येच कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्योती शिवदास गीते असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवदास तुकाराम गीते असे आरोपी पतीचे नाव आहे. चंदन नगर पोलिसांनी शिवदासला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये ज्योतीने (२७ वर्षे) शिवदास गीते (३७ वर्षे) याच्याशी लग्न केले होते. हे दाम्पत्य मूळचे बीडचे असून पुण्यातील खराडी भागात वास्तव्यास होते. या दाम्पत्याला ५ वर्षाचा अथर्व नावाचा मुलगा सुद्धा आहे. ज्योती शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती. तर तिचा नवरा शिवदास गीते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालयामध्ये स्टेनो म्हणून कार्यरत होता. जानेवारी १५ रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते.

परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदासला सांगत होती. २२ जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणे झाले तेव्हा तिने शिवदासला त्रास देत असल्याचे सांगितलं. संध्याकाळी पावणे ७ वाजता ज्योती तिच्या पतीला परीक्षेचा अभ्यास करण्यास सांगत होती. याचा राग आल्याने शिवदासने शिलाई मशीन वर वापरण्यात येणाऱ्या कात्रीने मुलाच्या समोर ज्योतीची निर्घृणपणे हत्या केली.

इतकंच नाहीतर त्याने हत्या केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा काढला. यानंतर शिवदास ने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत हा सगळा घटनाक्रम सांगितला. चंदननगर पोलिस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. खराडी परिसरात तो भाड्याने राहतो. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती. शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. 'माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल.', असा त्याला संशय होता. या संशयात त्याने ज्योतीची हत्या केली. पुढील तपास खराडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. ज्योती गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये काय म्हणतोय आरोपी -

'मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला माराव किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT