पुण्यातील एमआयटी कॉलेज कॅम्पसमध्ये ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला.
मृतदेह पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
एमआयटी कॉलेजमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे.
मृत व्यक्तीचे नाव सुभाष कामठे असून ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते.
पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. एमआयटी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका पुरूषाचा मृतदेह आढळला. त्यामुळे कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. घाबरून सर्वांची धावाधाव झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेचा तपास सध्या पुणे पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला. सुभाष कामठे (६५ वर्षे) असं मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुभाष कामठे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. ते पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहत होते. आपल्या कुटुंबीयांसोबत ते फुरसुंगीमध्ये राहत होते.
सुभाष कामठे यांना दारूचे व्यसन होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एमआयटी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. कॉलेज परिसरातील तलावात हा मृतदेह तरंगताना दिसून आला. कॉलेज कॅम्पसमधून जाणारे विद्यार्थी हा मतदेह पाहून प्रचंड घाबरले. सर्वांची पळापळ झाली. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली. त्यानंतर घटनास्थळावर एकच गर्दी झाली.
याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनासस्थळ गाठत तपास सुरू केला. संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली या अँगलने देखील तपास केला जात आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.