Pune toxic liquor case Death toll  
मुंबई/पुणे

पुणे हादरले! १३ जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसर-पिंपरी चिंचवडमध्ये शोककळा, धक्कादायक कारण समोर

Pune toxic liquor case Death toll :पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे १३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

13 dead due to toxic liquor in Pune : मागील २ दिवसांत पुण्यात १३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये २४ तासात ८ जण दगावले आहेत, तर हडपसरमध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी दारूमुळे पुण्यात २४ तासांत १३ जणांचा जीव गेल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या भयंकर घटनेनंतर पुण्यातील कायदा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विषारी दारूमुळे हसत्या खेळत्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील हडपसर भागातही विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोटात मळमळ झाल्याने पुण्यातील हडपसरमध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पिंपरीत आठ जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्यानंतर पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत हडपसर आणि काळेपडळ पोलिस तपास करत आहेत.

या प्रकरणावर कोणीही याबाबत तक्रार देण्यासाठी आलेले नाही. पुण्यात मृत्यू झालेल्या सर्वांच्या मृत्यूचे कारण एकच पोट दुखी आणि मळमळ करणे असे होते. त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट किंवा फिर्याद आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपास करण्यात येत आहे.

पुण्यात कुणाचा मृत्यू?

1.राहुल शरद क्षीरसागर वय 45 वर्षे राहणार पांढरे मळा सर्वे नंबर 257 हडपसर पुणे

2.विजय. भू कुरलाल शर्मा वय 45 वर्षे राहणार पांढरी मळा ससाणे नगर हडपसर पुणे

3.अरुण डाडर --हडपसर

4.अशोक रमेश चव्हाण राहणार काळेपडळ

5.विजय भूकुरलाल शर्मा राहणार पांढरे मळा ससाणे नगर हडपसर

पिंपरी चिंचवड (फुगेवाडी,पिंपळे गुरव )

मृतांची नावे-

१) पाडुरंग फुगे

२) विजय प्रकाश राठोड

३) राजेंद्र प्रकाश राठोड

४) राजू रजपुत

५) अकबर पठाण

६) बाबा शेख

७) आनंद देसाई

८) आनंद निकाळजे

या दोघांची प्रकृती चिंताजनक

१) सुभाष डिगीकर - मेडी पाॅईट हॉस्पिटल

२) अक्षय अवसरमल - यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल

आरोपीला बेड्या -

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी आरोपी योगेश वानखेडे याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. योगेश वानखेडे या आरोपीवर अगोदर ही गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर या अगोदर तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ही पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT