Woman Tortured by Husband for Seeking Marital Relations Saam
मुंबई/पुणे

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Woman Tortured by Husband for Seeking Marital Relations: पुण्यातील येरवड्यात विवाहितेवर पतीकडून अमानुष अत्याचार. पत्नीकडून वैवाहिक संबंधाची मागणी, पतीकडून छळ.

Bhagyashree Kamble

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पतीकडेच शरीरसंबंधाची मागणी करताच पतीनं नकार देत तिच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले. ही धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह सासरच्या ५ मंडळींविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल १०१५ रोजी महिलेचं आरोपी पतीसह विवाह झाला होता. लग्नाला ६ महिने उलटले तरीही पती - पत्नीमध्ये वैवाहिक संबंध नव्हते. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून पती पत्नीपासून दूर राहत होता. यानंतर महिलेनं पुढाकार घेऊन पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती घराबाहेर जाऊन झोपत होता. विवाहितेनं याची माहिती सासरच्या मंडळींना दिली.

परुंतु, सासरच्या मंडळींनी तिला मदत करण्याऐवजी 'बाहेर कुणाला सांगू नको', अशी धमकी दिली. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिच्यावर वारंवार छळ केला जात होता. अत्याचार वाढत गेला. याच त्रासाला कंटाळून महिलेनं धाडस करत पोलीस ठाणे गाठले. तसेच सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली.

२९ वर्षीय विवाहितेनं येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी पती, सासू, नणंद, चुलत नणंद, चुलत सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

गुप्तांगावर आणि मांडीवर सिगारेटचे चटके

विवाहितेनं पोलिसांनी सांगितले की, पती शरीरसंबंध ठेवण्यास पुढाकार घेत नसल्यामुळे तिनं डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानं आपण फिट असल्याचं सांगितलं. त्यानंतर महिलेनं माहेरी जाण्यची धमकी दिली. आरोपीनं संतापून विवाहितेला बेडरूममध्ये नेऊन तिच्या गुप्तांगावर आणि मांडीवर सिगारेटचे चटके दिले.

सध्या विवाहित महिला माहेरी राहत असून, सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

शिवाजी महाराजांना छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

SCROLL FOR NEXT