Pune water Park  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Pune : वॉटरपार्कमध्ये जाताय तर सावधान! शिरुरमध्ये महिलेच्या मणक्याचे चार तुकडे

Pune water park accident woman spinal injury details : पुण्यातील वॉटरपार्कमध्ये गंभीर अपघात; स्लाईडवरून पडून महिलेच्या मणक्याला गंभीर दुखापत. सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका वाढल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

Suprim Maskar

Water park accident Pune : उन्हाळ्यात मस्तीसाठी वॉटरपार्कमध्ये जातायत तर सावधान... कारण वॉटरपार्कची मस्ती जीवघेणी ठरतेय... पुण्यात पुन्हा एकदा वॉटरपार्कमध्ये धक्कादायक दुर्घटना घडलीय..त्यामुळे वॉटरपार्क मृत्यूचा सापळा कसे ठरतायत... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

उन्हाळ्याच्या सुट्टीत मौजमज्जा करण्यासाठी कुटुंबासोबत वॉटरपार्कमध्ये जातायत, तर वेळीच सावध व्हा....खेळण्याच्या अतिउत्साहात तुमची एक चुक तुमच्या जीवावर बेतू शकते...आम्ही असं का सांगतोय कारण शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीतील एका कृषी पर्यटन केंद्रात घडलेली एक घटना..

जीवघेणा वॉटरपार्क

३७ वर्षांची महिला आपल्या कुंटंबासहित वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेली..

तिथे वॉटर स्लाईडवरून घसरताना पाणीपातळी कमी असल्यानं महिला पूलमध्ये आदळली

या अपघातानंतर वॉटरपार्ककडे स्वतःची रुग्णवाहिका किंवा प्रथमोपचाराचं साहित्य नव्हतं

या अपघातात महिलेच्या पाठीचे 4 मणके तुटल्यानं अर्ध शरीर निकामी

पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरून पर्यटन केंद्राच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूणच वॉटरपार्कमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं समोर आलंय. एप्रिल 2025 मध्ये पुण्यातील भोर तालुक्यातील एका वॉटरपार्कमध्ये झिपलाईनवरून पडून एक तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.. एक वर्षांनी पुण्यातील शिरुर तालुक्यात वॉटरपार्कमध्ये महिलेचा स्लाईडवरून पडून अपघात झाल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय..

फक्त नफा कमावण्याच्या नादात पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा वॉटरपार्क व्यवस्थापनावर आता कठोर कारवाईची गरज आहे ? .. मात्र त्याचबरोबरत पर्यटकांनीही वॉटरपार्कमध्ये जाण्यापूर्वी तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची योग्य माहिती घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमची एक चुक जीवावर बेतू शकते.

रोहिदास घाडगे, साम टिव्ही न्यूज, शिरुर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेव्हिड मिलरला अश्रू अनावर! दिल्लीला शेवटच्या २ चेंडूंत २ धावा हव्या होत्या; पण गुजरातने जबड्यातून विजय हिसकावला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा, हायकोर्टाने निवडणूक याचिका फेटाळली

Thursday Horoscope: जवळच्या व्यक्तीपासून राहा सावध, ५ राशींना होणार धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

Iran-US War: अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं? युद्धविरामाची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT