Pune Shirur midnight accident details  Saam
मुंबई/पुणे

Pune accident : पुण्यात मध्यरात्री मृत्यूचं तांडव! वंदनाच्या डोळ्यासमोर नवरा, मुलगी अन् भावाचा मृत्यू, ट्रकने कारला चिरडले

Pune Shirur midnight accident details : पुण्यातील शिरूर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या भीषण ट्रक-कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून वंदना काळे गंभीर जखमी आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

Pune road accident latest news : पुण्यातील शिरूर तालुक्यातील नागरगावात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपगातात वंदना काळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यामोरच भाऊ, नवरा अन् मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पवन राजहंस काळे (३४) व त्यांची चिमुकली मुलगी आराध्या काळे (९), दोघे रा. निमोणे, तसेच मेहुणे बाळासाहेब प्रकाश नागवडे (३८, रा. बाबुराव नगर, शिरूर; मूळ रा. गुनवडी, जि. अहील्यानगर) यांचा मृत्यू झाला. वंदना पवन काळे (३०) या गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोळ्यासमोर नवरा, भाऊ अन् मुलीचा मृत्यू झाल्याने वंदा हादरून गेल्यात.

न्हावरे–चौफुला राष्ट्रीय महामार्गावरील नागरगाव (ता. शिरूर)हद्दीतील नलगे वस्ती येथे मध्यरात्री भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या कारला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील बाप, चिमुकली मुलगी आणि मेहुणा जागीच ठार झाले. तर पत्नी गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे. निमोणे गावावर शोककळा पसरविणारी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,निमोणे येथील पवन काळे हे पत्नी, मुलगी व मेहुण्यासह कोल्हापूर येथे शिक्षणासाठी असलेल्या मुलाला भेटून परत येत होते. नागरगाव हद्दीतील नलगे वस्ती येथे रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास शिरूरकडून येणाऱ्या ट्रक (एम.एच ०९ ई.एम २४६४) ने त्यांच्या मोटार क्र (एम.एच १२ एस.क्यू ५४४१)ला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश उसळला.

स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमींना प्रथम चौफुला येथील रुग्णालयात, तर नंतर न्हावरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित करताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी ट्रकचालक धनराज काशिनाथ भिसे (रा. भिसे वाघुली, जि. लातूर) याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने घेतला एक बळी

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

भारतीय रेल्वेचा नवा वेगवान चमत्कार! वंदे भारतने गाठला 180 kmph वेग; प्रवाशांचा किती वेळ वाचणार?

SCROLL FOR NEXT