Sharad Pawar at Pune Metro गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

Pune: शरद पवारांची मेट्रोतून सफर; पुणे मेट्रोच्या कामाचा घेतला आढावा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानकपणे पुणे मेट्रोतून सफर केली आहेत.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे, गोपाळ मोटघरे

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अचानकपणे पुणे (Pune ) मेट्रोतून (Metro) सफर केली आहेत. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेत आणि अधिकाऱ्यांना काही सूचना देखील दिले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला आहे. (Sharad Pawar Visits Pune Metro)

हे देखील पहा-

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम किती झाले आहे? कधीपर्यंत ऊर्वरित काम पूर्ण होणार आहेत? कामात काही अडथळा आहे का? मेट्रोच्या कामाकरिता कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या आदी गोष्टींची माहिती या अधिकाऱ्यांकडून पवारांनी घेतली आहे. यावेळी पवारांनी फुगेवाडी (Phugewadi) ते पिंपरीतील (Pimpri) संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. तसेच अधिकारी देखील उपस्थित होते.

यामुळे मेट्रोच्या डब्यामध्ये गर्दी झाली होती. पवारांनी मेट्रोतून उभ्यानेच प्रवास केला आहे. या प्रवासात त्यांनी अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली आहे. शरद पवारांनी ज्या फुगेवाडी स्थानकातून मेट्रोतून सफर केली आहे. त्या फुगेवाडी स्थानकाचे काम ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्याची माहिती देखील पवारांनी यावेळी घेतली आहे. संत तुकाराम नगर स्टेशनच्या सेफ्टी ऑडिटकरिता २ महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना पिंपरी ते फुगेवाडी हा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यामध्ये थंडीची चाहूल, पुढील दोन दिवस स्थिर तापमान

Public Holiday List: पुढच्या वर्षी सुट्ट्याच सुट्या! आत्ताच करा लाँग वीकेंडचं नियोजन, २०२५ मध्ये कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या?

Maharashtra Politics : कार्यकर्त्यांना हेच शिकवता? गद्दार म्हटल्यानंतर शिंदेंचा पारा चढला, थेट कार्यलात जाब विचारला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Success Story: कोण म्हणतंय लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो? घर आणि नोकरी सांभाळत UPSC क्रॅक; IPS तनुश्रीची यशोगाथा!

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

SCROLL FOR NEXT