Manorama Khedkar Bail Saam Tv
मुंबई/पुणे

Manorama Khedkar Bail: मोठी बातमी! माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना जामीन मंजूर

IAS Pooja Khedkar : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यावर पिस्तूल रोखून त्याला धमकावल्याचा आरोप होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या शेतकऱ्याला धमकावताना दिसत आहेत.

याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज त्यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

पूजा खेडकर नॉट रिचेबल

दरम्यान, दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता, त्यानंतर अटकेच्या भीतीने त्या नॉट रिजेबल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर यांचा मोबाईल नंबर बंद आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून त्यांचा शोध लागत नव्हता. यूपीएससी परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या सर्व वादानंतर पूजा खेडकर यांना 23 जुलै रोजी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाण्यास सांगण्यात आले, मात्र त्या तिथे गेल्या नाही. यातच त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं बोललं जात आहे. यातच पूजा खेडकर यांनी परदेशात पलायन केलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT