Pune Kothrud Electric Gas Fraud News Saam Tv
मुंबई/पुणे

Fraud : आधीच गॅस टंचाई, त्यात सायबर फसवणूक, पुण्यात इलेक्ट्रिक शेगडी पडली ३ लाख रूपयांना

Pune Kothrud Electric Gas Fraud News : पुण्यातील कोथरूड भागात ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाली असून इलेक्ट्रिक शेगडी खरेदीच्या बहाण्याने ३ लाखांहून अधिक रक्कम लुटण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Akshay Badve

  • पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची सायबर फसवणूक

  • इलेक्ट्रिक शेगडी खरेदीत ३ लाखांचा फटका

  • पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला

राज्यात आधीच गॅस टंचाई असून डोंबिवली नंतर आता पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील उच्चभ्रू कोथरूड परिसरातील ज्येष्ठ नागरिकाने ऑनलाईन मागवलेली इलेक्ट्रिक शेगडी ३ लाख रुपयांना पडली असून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने तसेच गॅस खरेदीसाठी मोठ्या रांगा असल्याने, अनेक जणं इलेक्ट्रिक शेगडीकडे वळत असल्याने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक शेगडीची विक्री होते आहे. याच गोष्टीचा फायदा आता सायबर चोरटे घेऊ लागले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस मिळत नसल्याने पुण्यातील कोथरूड भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने इलेक्ट्रिक शेगडी विकत घ्यायचं ठरवलं. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांनी इलेक्ट्रिक शेगडीची जाहिरात बघितली. त्यांनी जाहिरातीवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाइन पद्धतीने पाठवावे लागतील असं त्यांना सांगण्यात आलं.

फोनवर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची पूर्ण माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून ३ लाख १० हजार रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. याप्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics : काँग्रेस पक्षात मानापमान नाट्य, अध्यक्षपदावरून नेत्यांमध्ये नाराजी

Army Cheetah Helicopter Crash: मोठी बातमी! लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; डोंगराला धडकलं चीता हेलिकॉप्टर

Maharashtra News Live Update: नागपुरात उष्णतेचा वाढता कहर, वेगवेगळ्या कारणाने ७ दिवसांत १८० मृत्यूंची नोंद, काहींचा उष्माघाताने मृत्यू

Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच; विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपची कोंडी

भीमाशंकर कुणाचं? खेड की आंबेगावचं? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपली

SCROLL FOR NEXT