Pune’s Tathawade area where a ₹750 crore government land belonging to the Animal Husbandry Department was allegedly sold for ₹33 crore sparking a massive land scam controversy. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune 750 Crore Animal Husbandry: पुण्यात दुसरा जमीन घोटाळा झालाय... हा घोटाळा नेमका कोणी केला? 750 कोटींची जमीन कमी किंमतीत विकून प्रशासकीय व्यवस्थेला धाब्यावर बसवणारे नेमके कोण आहेत? भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा हा प्रकार पुण्यात नेमका कुठे घडलाय?

Suprim Maskar

पुण्यात पुन्हा एकदा मोठा जमीन घोटाळा झालाय... पिंपरी चिंचवड शहरातल्या ताथवडेमधील पशुसंवर्धन विभागाची तब्बल 750 कोटींची शासकीय जमीन 33 कोटीला विकण्यात आलीय.... आधीच भूखंड घोटाळ्यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेले असताना या नव्या घोटाळ्यानं राज्याला चांगलाच हादरा दिलाय...नेमकं हा घोटाळा कसा करण्यात आला

पुण्यातील दुसरा मोठा जमीन घोटाळा -

पिंपरी-चिंचवडच्या ताथवडेत पशुसंवर्धन खात्याची 16 एकर जागा

जमिनीची किंमत सुमारे 750 कोटी रुपये

हेरंब गुपचूप यांच्या वारसदारांकडून जमिनीचा व्यवहार

पशुसंवर्धन खात्याची NOC न घेता जमिनीची परस्पर विक्री

जानेवारी 2025मध्ये गुपचूप यांच्या 22 वारसदारांकडून केवळ 33 कोटींना विक्री

कपिल छोटम फकीर, सय्यद फैयाज मीर अजिमोद्दीन यांना जमीन विकली

दरम्यान 1945 पासून ताथवडेतील जवळपास 178 एकर जमीन पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात आहे... त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची जमीन आयुक्ताच्या परवानगीशिवाय विकता येत नाही... तरीही ही जमीन हेरंब गुपचूप याच्या कुटुंबीयांनी परस्पर विकल्याचा आरोप फार्म मॅनेजर अमोल आहेर यांनी दिलीय...

पिंपरी चिंचवड शहरातील या जमिनीची दापोडी येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यात आलीय.. त्यामुळे जमीन घोटाळ्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय... या प्रकरणात लवकरच पोलिस गुपचूप यांचे 22 वारस आणि खरेदीदार यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे..

आधीच राजकीय नेत्यांना हाताशी धरून भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा प्रकार राज्यात घडत असताना या घोटाळ्यात कुणाचे हितसंबंध आहेत..आणि गुपचूपांच्या वारशांनी कुणाच्या मदतीनं हा प्रताप केला आहे याचा योग्य तपास होण गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT