pune news  Saam tv
मुंबई/पुणे

विद्येच्या माहेरघरात जादूटोणा, शाळेत गोलाकार चिन्हात लिंबू, अंडी अन् कुंकू; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

pune news : विद्येच्या माहेरघरात अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. शाळेत लिंबू, अंडी, कागदाचे तुकडे आणि कुंकू आढळल्याने शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली आहे.

Vishal Gangurde

पुण्यातील टाकवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अंधश्रद्धेचा प्रकार

शाळेच्या पटांगणात लिंबू, अंडी, कुंकू आणि गोलाकार चिन्ह

शाळा प्रशासनाने याबाबत पोलिसांना कळवलं

शाळेच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली

सचिन जाधव, साम टीव्ही

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच जादूटोणा करत उतारा करून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील टाकवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अंधश्रद्धेचा प्रकार घडलाय. या प्रकाराने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती पसरली आहे.

पुण्यातील या टाकवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लिंबू, कुंकू ,अंडी जमिनीवर ठेवण्यात आले आहेत. शाळेच्या पटांगणात लिंबू, अंडी, कुंकू आणि कागदाचे तुकडे टाकून गोलाकार चिन्ह काढलं आहे. या प्रकारामुळे शाळेच्या पटांगणाजवळ विद्यार्थी जाण्यास कचरत आहेत.

अचानक सापडलेल्या या वस्तूंमुळे विद्यार्थी आणि पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. शाळा प्रशासनाकडून घटनेची माहिती ग्रामपंचायत आणि पोलिसांना देण्यात आली आहे. हे कृत्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने केले याबाबत अद्याप स्पष्टता नाही.मात्र अशा कृतीमुळे शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळा व्यवस्थापनाने याबाबत ग्रामस्थांना अफवा न पसरवण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्याचे सांगितले. यापूर्वीही टाकवे पंचायत निवडणुकीत लिंबांवर नावे लिहून खिळे टोचण्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये नव्याने चिंता वाढली आहे.

शिर्डीत साईबाबांची प्रतिमा वृक्षात दिसल्याची अफवा

शिर्डीच्या साकुरी गावात एका वृक्षाजवळ अचानक गर्दी उसळली आहे. या वृक्षावर साईबाबांचा चेहरा दिसत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर हे दृश्य बघण्यासाठी वृक्षाभोवती मोठी गर्दी जमली.

साईबाबा हयात असताना ते शिर्डीहून राहाता गावामध्ये येत असताना साकुरीतील याच वृक्षाखाली थांबायचे असा साई चरित्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिर्डीला येणारे अनेक साईभक्त या वृक्षाच्या ज्याला कल्पवृक्ष देखील म्हटले जातं. अनेक साईभक्त दर्शनासाठी येतात. मात्र, सोमवारी रात्री 9 वाजे दरम्यान या वृक्षाच्या खोडावर साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याचा मेसेज सोशल माीडियावर व्हायरल झाल. त्यानंतर वृक्षाभोवती गर्दी उसळली. यावेळी काही जण फोटो काढत होते. तर काही जण वृक्षाचे दर्शन घेत होते. या प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अफवा पसरवण्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Garje Death Case:...म्हणून मी पोलिसांना फोन केला नाही; गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, टीझरमधील सीन बघून आश्चर्यचकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी, जय शहांची घोषणा

ICC कडून टी20 विश्वचषकाचे शेड्युल जाहीर; भारत-पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

Wednesday Horoscope: चहूबाजूंनी होईल पैशाचा वर्षाव, 5 राशीं होणार मालामाल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT