Water Shortage  saam tv
मुंबई/पुणे

Pune : ऐन पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी वणवण; ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा

पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची समस्या असल्याचे उघडकीस आले आहे. पावसात टँकरने पाणी पुरवठा डोंगराळ ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवली जात आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची समस्या असल्याचे उघडकीस आले आहे. पावसात टँकरने पाणी पुरवठा डोंगराळ ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवली जात आहे. ( Pune News In Marathi )

पुणे जिल्हा हा पाणलोट क्षेत्रासाठी अग्रेसर असून १३ धरणांमधून शेती आणि पिण्यासाठी पाणी वापरले जाते. मात्र, याच पुणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर जुलै महिन्यातही पाणी टंचाईची (Water Shortage ) गंभीर समस्या समोर आली आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यात ४३ गावांमध्ये ५१ खासगी टँकरमधून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत गावच्या पाणी योजना सक्षम होऊन शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन पाणी योजना राबविली जाते. मात्र, पाण्याचे स्त्रोत सक्षम नसल्याने पाणी योजना बंद पडत असल्याने गावच्या पाणी टंचाई होते. त्यामुळे पावसाळ्यातही पाण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नसल्याचे नागरिक सांगतात.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरच्या पाण्याची वाट पहावी लागत आहे. शासनाकडून दिवसभरात एका गावाला दोन वेळा पाणी पुरविण्यात येतं. त्यातही हे पाणी शुद्ध करुन 5 रुपयांना 10 लिटर पाणी विकत घ्यावं लागत असल्याने टंचाईच्या काळात पाणी विकत घेऊनही महिलांच्या डोक्यावरचा हंडा मात्र खाली उतरत नाही. नागरिकांच्या पिण्याच्या पाणीची टंचाई विहिरींनीही तळ गाठला आहे. जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष पाणी टंचाईचा सामना करणा-या गावांच्या पाण्याचा प्रश्न सरकार दरबारी लवकर सुटावा, अशी मागणी नागरिक करत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात संततधार सुरु आहे. तर दुसरीकडे पाण्यासाठी पुण्याच्या ९ तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील गावांना पाण्यासाठी नागरिकांना पाण्याच्या टँकरची वाट पहायला लागत आहे. तर महिला डोक्यावरील पाण्याचा हंडा कधी उतरणार असा प्रश्न नागरिकांसह महिलांना पडला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावांची पाणी टंचाई मायबाप सरकारने लवकर दूर करावी, अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT