Sassoon Hospital Peon Arrested By Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche car Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी कारवाई; दोघांचा जीव घेणाऱ्या पोर्शे कारची नोंदणी रद्द

Pune Porsche car Case update : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरटीओने मोठी कारवाई केली आहे. या अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या पोर्शे कारची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून आरोपींवर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा जीव घेणाऱ्या पोर्शे कारची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. आरटीओने या पोर्शे कारची नोंदणी रद्द केली आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलाने पोर्श कार चालवत दुचाकीवरील दोघांना उडवलं. या अपघाता दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर आरोपीवर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणी आरटीओने वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी कारवाई कारवाई केली आहे.

आरटीओने अल्पवयीन आरोपीने चालवलेल्या कारची नोंदणी रद्द केली आहे. मोटर व्हेहिकल अॅक्टमध्ये असलेल्या तरतुदीनुसार प्रादेशिक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे आरटीओकडून बेंगळुरू आरटीओला देखील पत्र पाठवले आहे.

चौकशीसाठी नर्सला बोलावलं

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी ससूनच्या काही नर्सला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बोलावलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही डॉक्टरांसमवेत असणाऱ्या नर्सला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.

ससूनमधील त्या तिघांची सखोल चौकशी होणार

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी तिघांना पुणे पोलीस आयुक्तालयात आणले गेले आहे. या प्रकरणी आर्थिक रसद, ब्लड रिपोर्ट फेरफार करणे, मोबाईलमधील मेसेजेस आणि कॉल अशा अनेक गोष्टींची चौकशी होणार आहे. डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर यांना आज न्यायालयात दाखल करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT